शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

५० लाख खर्च करून गायकवाड बंधंूनी सुकळीत बांधली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:17 AM

सुकळी येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात गुत्तेदारीचा व्यवसाय करत असलेले बिभीषण गायकवाड व बाळासाहेब गायकवाड या दोघा बंधूनी सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांची देणगी दिली

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात गुत्तेदारीचा व्यवसाय करत असलेले बिभीषण गायकवाड व बाळासाहेब गायकवाड या दोघा बंधूनी सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांची देणगी दिली असून, त्यातून या शाळेची अत्याधुनिक व सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. शाळा भरण्याच्या पहिल्या दिवशी तिचे लोकार्पण होणार आहे.सोमवारपासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक सत्राच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील एका विशेष गावात जाऊन शिक्षण सभापती मुक्काम करतात. गावातील नागरिक, पालक यांच्याशी चर्चा करून सकाळी विद्यार्थ्यांना गुलाब फुल, गणवेश, वही- पेन, देऊन स्वागत करतात. सभापती राजेसाहेब देशमुख यांनी यावर्षी केज तालुक्यातील सुकळी या गावाची निवड केली आहे. सकाळी गावात स्वत: फेरी काढून पहिल्याच दिवशी शाळेत शंभर टक्के उपस्थिती असावी असा संदेश देणार आहेत. यावेळी वृक्षारोपणही करण्यात येणार आहे.देशमुख यांच्यासह, शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड, उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे, केंद्रप्रमुख, शिक्षण विभागामधील सर्व टीमने रविवारी शाळेत मुक्काम केला.

टॅग्स :SchoolशाळाSocialसामाजिकfundsनिधी