वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:13 IST2026-04-03T12:10:33+5:302026-04-03T12:13:44+5:30

Satish Khokya Bhosale Beed: पिता-पुत्राला मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार, अशा विविध गुन्हे त्याच्यावर आहेत.

Satish Bhosale alias 'Khokya' is out of jail; Acquitted by the court | वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

Satish Khokya Bhosale Beed: भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले वर्षभरानंतर कारागृहाबाहेर आला आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे ढाकणे पिता-पुत्र मारहाण प्रकरणात तो मागील वर्षभरापासून कारागृहात होता. यातील एका प्रकरणात न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली असून, इतर गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर झाल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायालयाचा निकाल काय?

ढाकणे पिता-पुत्र मारहाण प्रकरणाची सुनावणी बीड न्यायालयात पार पडली. पुराव्याअभावी न्यायालयाने सतीश भोसले याला आरोपातून निर्दोष मुक्त केले. बॅटने मारहाण करण्याचे मुख्य प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. मात्र त्या प्रकरणासह इतर गुन्ह्यांमध्येही त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळेच काल सायंकाळी तो कारागृहातून बाहेर आला.

सुटकेनंतर सतीश भोसलेची प्रतिक्रिया

निर्दोष मुक्ततेनंतर सतीश भोसले म्हणाला की, सत्याचा विजय झाला आहे. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. न्यायालयात सत्य समोर आले आणि माझी निर्दोष मुक्तता झाली. मला न्यायदेवतेवर विश्वास होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता खोटी होती. मला टार्गेट करून माझ्या कुटुंबावर अन्याय करण्यात आला.

दरम्यान, कारागृहातून सुटल्यानंतर सतीश भोसले आपल्या शिरूर कासार येथील घरी गेला. यावेळी वनविभागाने अतिक्रमण कारवाईत त्याचे घर पाडल्यामुळे उध्वस्त झालेला संसार पाहून तो म्हणाला, एका वर्षात माझ्या आयुष्याची पूर्ण कमाई संपली, मी पूर्णपणे बरबाद झालो आहे. आज माझे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आहे. घरातील लेकराबाळांना आणि आई-वडिलांना राहायला छत नाही. 

नेमकं प्रकरण काय?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याच दरम्यान सतीश भोसलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणासोबतच शिरूर तालुक्यात पिता-पुत्रांना मारहाण, वन्य प्राण्यांची शिकार प्रकरण आणि घरात हरणाचे मांस आढळल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

सोशल मीडियावर चर्चेत असलेली लाइफस्टाइल

सतीश भोसले हा सोशल मीडियावरील रील्समुळेही चर्चेत आला होता. गाडीच्या डॅशबोर्डवर पैशांची बंडल दाखवणे, हेलिकॉप्टरमधून एन्ट्री आणि पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान जीवनशैली असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. 

Web Title : सतीश भोसले 'खोक्या' एक साल बाद जेल से बरी; जीवन बर्बाद।

Web Summary : हमला मामलों में आरोपी सतीश भोसले सबूतों के अभाव में एक साल बाद जेल से बरी हो गए, हालांकि अन्य मामले अभी भी लंबित हैं। भोसले का दावा है कि झूठे आरोपों ने उनके परिवार को बर्बाद कर दिया, घर तोड़े जाने के बाद वे बेघर हो गए।

Web Title : Satish Bhosale 'Khokya' acquitted after year in jail; life ruined.

Web Summary : Satish Bhosale, accused in assault cases, was acquitted after a year in jail due to lack of evidence, though other cases remain. Bhosale claims false accusations ruined his family, leaving them homeless after his home was demolished.