संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष गेवराईजवळील अपघातात ठार; चारजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:27 IST2022-03-31T16:27:13+5:302022-03-31T16:27:53+5:30

राष्ट्रीय महामार्गावरील सिरसदेवीच्या पुढे काही अंतरावरील पुलाला कार धडकली.

Sambhaji Brigade's Nanded district president Sham Patil killed in an accident near Gevrai; Four were seriously injured | संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष गेवराईजवळील अपघातात ठार; चारजण गंभीर जखमी

संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष गेवराईजवळील अपघातात ठार; चारजण गंभीर जखमी

गेवराई (बीड) : औरंगाबादहून गढीमार्गे  नांदेडकडे जाणारी कार आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास सिरसदेवीच्या पुढे रस्त्यावरील पुलाला धडकुन झालेल्या अपघातात एकजण ठार तर चारजण जखमी झाले आहेत. शाम पाटील असे मृताचे नाव असून ते नांदेडचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती आहे. 

देगलुर येथील शाम पाटील (४३ ) हे इतर चार मित्रांसोबत कारने ( एम.एच 26 बी.जी 2526 ) आज पहाटे औरंगाबादहून गढीमार्गे नांदेडकडे प्रवास करत होते. दरम्यान, ४ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सिरसदेवीच्या पुढे काही अंतरावरील पुलाला कार धडकली. यात शाम पाटील जागीच ठार झाले. तर इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बीड जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. 

घटनास्थळी तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मनमिळाऊ स्वभावाचे पाटील गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

 

Web Title: Sambhaji Brigade's Nanded district president Sham Patil killed in an accident near Gevrai; Four were seriously injured