रस्ते कागदावर, पैसा समोरच्या बंगल्यात जायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:06 IST2019-08-28T00:05:16+5:302019-08-28T00:06:02+5:30

पाच वर्षांपूर्वी गेवराई मतदार संघासाठी जेवढा निधी आला, तो फक्त कागदावरच यायचा. रस्ते कागदावर आणि पैसे मात्र समोरच्या बंगल्यात जायचे अशी टीका करत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सभास्थळाजवळ असलेल्या ‘कृष्णाई’ बंगल्याकडे कटाक्ष टाकला.

On the road paper, money would go to the front bungalow | रस्ते कागदावर, पैसा समोरच्या बंगल्यात जायचा

रस्ते कागदावर, पैसा समोरच्या बंगल्यात जायचा

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांची टीका : मुख्यमंत्री म्हणाले, जनता विरोधकांना २५ वर्षे जवळ करणार नाही; पवारांची केली प्रशंसा

सखाराम शिंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : पाच वर्षांपूर्वी गेवराई मतदार संघासाठी जेवढा निधी आला, तो फक्त कागदावरच यायचा. रस्ते कागदावर आणि पैसे मात्र समोरच्या बंगल्यात जायचे अशी टीका करत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सभास्थळाजवळ असलेल्या ‘कृष्णाई’ बंगल्याकडे कटाक्ष टाकला. तर राज्यातील जनता आमचे दैवत आहे व संकटात भाजपा सरकार त्यांच्यासोबत आहे. विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता सुध्दा मिळाला नाही व या पुढे देखील मिळणार नाही. पुढील २५ वर्षे राज्यातील जनतादेखील विरोधकांना जवळ करणार नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
गेवराई येथील शाहुनगरी येथे मंगळवारी महाजनादेश यात्रेच्या सभेत ते बोलत होते. बीडहून निघालेल्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी गढीपासून ते गेवराईपर्यंत जवळपास ४ हजार मोटार सायकलींची रॅली काढण्यात आली. सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ.प्रितम मुंडे, आ.आर.टी. देशमुख, आ.सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरजितसिंह ठाकूर, आ.संगिता ठोंबरे, आ.भीमराव धोंडे, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, शिवराज पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रामाणिक आणि विकासाची दृष्टी असल्यामुळे लक्ष्मण पवार आम्हाला आवडतात. या पाच वर्षात रस्ते कागदावर नाही तर जनतेसाठी चकाचक मजबूत बनविले. भ्रष्टाचारमुक्त करणाऱ्या पवारांच्या पाठिशी म्हणून आम्ही आहोत. जातीची शिडी घेऊन राजकारण करणाºया मंडळींना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जागा दाखवली, असे त्या म्हणाल्या.

Web Title: On the road paper, money would go to the front bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.