Rickshaw pulls up with tips; One killed | भरधाव टिप्परची रिक्षाला धडक; एक ठार
भरधाव टिप्परची रिक्षाला धडक; एक ठार

अंबाजोगाई : शहरापासून जवळच असलेल्या बुट्टेनाथ परिसरात जयवंती नदीच्या पुलाजवळ भरधाव टिप्परने आॅटोरिक्षाला दिलेल्या धडकेत येल्डा येथील श्रीकिसन केरबा फुगनर (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षातील इतर पाच जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी ५ वाजता झाला.
आॅटोरिक्षा हा अंबाजोगाईहून येल्डा गावाकडे निघाला होता. बुट्टेनाथ घाटाच्या खाली जयवंती नदीच्या पुलावजवळील वळणावर रिक्षा आला असता समोर बाभळीच्या झाडाची फांदी आल्याने रिक्षाचालक सुरेश कांबळे याने रिक्षा रोडच्या बाजूला घेतली होती.
तेवढ्यात समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षात कडेला बसलेले श्रीकिसन फुगनर यांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालकासह डॉ. बाळासाहेब सुरवसे, रूपचंद सुरवसे, जनार्दन धनगे आणि आशाबाई कांबळे हे जखमी झाले. या प्रकरणी डॉ. बाळासाहेब सुरवसे यांच्या फिर्यादीवरून टिपर चालकावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.


Web Title: Rickshaw pulls up with tips; One killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.