गप्पा मारताना रिक्षाची धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:16 IST2019-01-21T01:16:05+5:302019-01-21T01:16:19+5:30
भरधाव रिक्षाने धडक दिल्याने दुकानासमोर गप्पा मारत उभ्या असलेल्या एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेसात वाजता सिरसेदवी फाटा (ता. गेवराई) येथे घडली.

गप्पा मारताना रिक्षाची धडक; एक ठार
सिरसदेवी : भरधाव रिक्षाने धडक दिल्याने दुकानासमोर गप्पा मारत उभ्या असलेल्या एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेसात वाजता सिरसेदवी फाटा (ता. गेवराई) येथे घडली.
प्रकाशचंद मोतीलाल आब्बड (५५, रा. रुई धानोरा, ता. गेवराई) असे मयताचे नाव आहे. सिरसदेवी फाट्यांवर त्यांचे दुकान आहे. प्रकाशचंद आब्बड हे मुलगा प्रवीण व गावातील भागवत धायगुडे यांच्यासमवेत दुकानासमोर गप्पा मारत उभे होते. यावेळी माजलगावहून गढीकडे जाणाऱ्या रिक्षाने (क्र.एमएच ०६ एजी-७०५०) त्यांना धडक दिली. यात प्रकाशचंद हे गंभीररित्या जखमी झाले. प्रसंगावधान राखून प्रवीण बाजूला झाला तर भागवत धायगुडे यांच्या पायाला जखम झाली. अपघातानंतर चालकाने रिक्षा सुसाट गढीकडे नेला.
दरम्यान, जखमी प्रकाशचंद यांना तातडीने वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुध्द प्रवीण आब्बड यांनी रुग्णालय चौकीमध्ये तक्रार दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.