गतिमंद युवतीवर नात्यातील तरुणाने केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 19:33 IST2019-03-12T19:30:41+5:302019-03-12T19:33:33+5:30

आरोपीने गतीमंदतेचा गैरफायदा घेत वेळोवेळी संधी साधत तिच्यावर अत्याचार केला.

relative youth's rape on divyang girl at ambajogai | गतिमंद युवतीवर नात्यातील तरुणाने केला अत्याचार

गतिमंद युवतीवर नात्यातील तरुणाने केला अत्याचार

ठळक मुद्देपीडिता गर्भवती राहिल्याने प्रकरणाला फुटली वाचाशेपवाडीतील घटनेने खळबळ; तरुणावर गुन्हा दाखल

अंबाजोगाई (बीड ) : भावकीतील एका २२ वर्षीय गतिमंद तरुणीवर तिच्या भोळेपणाचा फायदा घेत एका नराधमाने चार महिन्यापासून अत्याचार केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडीत घडली. पिडीत युवती गर्भवती राहिल्याने अखेरीस हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. 

याप्रकरणी पिडीतेच्या वडिलांनी अंबाजोगाई पोलिसात तक्रार दिली आहे. पिडीतेचे वडील एका मंगल कार्यालयात मजुरीचे काम करतात. पिडीता जन्मजात गतिमंद आहे. यापूर्वी तिला शिक्षणासाठी एका निवासी शाळेत दाखल करण्यात आले होते. मात्र, तिचे शाळेचे वय संपल्यानंतर मागील चार वर्षापासून ती घरीच असते. याच दरम्यान गत वर्षीच्या १५ नोव्हेंबरपासून तिच्या भावकितील शाम नाथराव शेप या नराधमाने तिच्या भोळसरपणाचा आणि गतीमंदतेचा गैरफायदा घेत वेळोवेळी संधी साधत तिच्यावर अत्याचार केला.

यातून पीडिता गर्भवती राहिली. तिच्या शरीरातील बदल नातेवाईक महिलांच्या नजरेतून सुटले नाहीत. त्यामुळे परिचारिकांमार्फत तपासणी केली असता पीडिता चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात शाम शेप याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

Web Title: relative youth's rape on divyang girl at ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.