शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढ विरोधात रायुकाँचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

आष्टी : मागील काही दिवसापासून दररोज पेट्रोल, डिझेल दरवाढ सुरू आहे. या वाढत्या महागाईमुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले ...

आष्टी : मागील काही दिवसापासून दररोज पेट्रोल, डिझेल दरवाढ सुरू आहे. या वाढत्या महागाईमुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती वापरातील गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे आणखी जास्त हाल केले आहेत. त्यामुळे सोमवारी आष्टी तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करुन पेट्रोल व्यावसायिकांना पेढे भरवून गांधीगिरी मार्गाने सरकारचा निषेध नोंदवून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे,मनोज चौधरी,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सुरेश पवार,युवक जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गर्जे,सरपंच महादेव आंधळे,हरिष सांगळे,शौकत पठाण,सरपंच महादेव कोंडे,उपसरपंच गणेश गर्जे,बाबासाहेब जगताप,संदीप जगदाळे,विकास शिंदे,बाबासाहेब पोकळे,सतीश औटे, विठ्ठल खाळे,नाजिम पठाण,आबासाहेब तांबे,शारुक तांबोळी,प्रवीण तोडकर,अनवर तांबोळी,राजू पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारने जनतेला भूलविले

केंद्र सरकारने तत्काळ इंधनाचे व गॅस दरवाढ कमी न केल्यास अजून मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे यांनी दिला. केंद्र सरकारने अच्छे दिन दाखवत पेट्रोल १०६ रुपयांवर तसेच खाद्यतेल,गॅस महाग केल्याने गरिबांना उपाशीपोटी मरण्याची वेळ येत आहे. उज्ज्वला गॅस ,व अनेक योजनांची फूस लावून भोळ्या भाबड्या जनतेची मने जिंकणाऱ्या केंद्र सरकारने याच जनतेला जगावे की मरावे या मनस्थितीत आणून ठेवल्याचे ते म्हणाले.

050721\img-20210705-wa0320_14.jpg