राविकाँचे ‘जोडे मारा’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:01 IST2018-09-21T00:59:07+5:302018-09-21T01:01:15+5:30
शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष नेताजी साळुंकेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शाळा अनुदान संबंधीच्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत येथील बसस्टँडसमोर प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

राविकाँचे ‘जोडे मारा’ आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष नेताजी साळुंकेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शाळा अनुदान संबंधीच्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत येथील बसस्टँडसमोर प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
या वेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ‘धिक्कार असो धिक्कार असो प्रकाश जावडेकरांचा धिक्कार असो, ‘शिक्षा दे ना सके वो सरकार निक्कमी है, जो सरकार निक्कमी है वो सरकार बदलनी है, तख्त बदल दो ताज बदल दो बेईमानो का राज बदल दो अशा घोषणांनी परिसर दणाणला. यावेळी नेताजी साळुंके, रविकिरण देशमुख, ऋषी शिंदे, रणजीत राठोड, अविनाश धानूरकर, अर्जुन भोसले, प्रवीण गंगणे, प्रदीप जाधव, अजिंक्य साळुंके, गणेश केदार, गोविंद साळुंके, निखिल हारे, अल्ताफ शैख, ऋषिकेश मोरे, प्रशांत कदम, आकाश पवार, आशिष देशमुख, आकाश मगर, कृष्णा चौरे आदी सहभागी होते.