शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

हातभट्ट्यांवर धाडसत्र, पंधरा गुन्ह्यात तीन लाखांचा मुद्देमाल जप्त - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

बीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्टी विरोधात धाडसत्र सुरू असून शनिवारी अंबाजोगाई येथील भरारी पथक व औरंगाबाद ...

बीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्टी विरोधात धाडसत्र सुरू असून शनिवारी अंबाजोगाई येथील भरारी पथक व औरंगाबाद येथील विभागीय भरारी पथकांनी अंबाजोगाई तालुक्यातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून ९४०० लीटर रसायन व १५ लीटर हातभट्टी दारू जप्त केली. या कारवाईत २ लाख ७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अंबाजोगाई तालुक्यातील बुटेनाथ दरी परिसरात धाडी टाकून तेथे हातभट्टी दारूची निर्मिती होत असल्याचे दिसून आले. तेथील गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन व तयार हातभट्टीची दारू जागीच नष्ट करण्यात आली. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये विभागाकडून ७ बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने २३ जुलै रोजी हॉटेल व धाब्यांची अचानकपणे तपासणी केली असता पाच धाब्यांवर देशी दारू, विदेशी दारू तसेच बिअरचा मुद्देमाल मिळून आल्याने पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. आष्टी तालुक्यातील कडा परिसरात व माजलगाव तालुक्यातील हातभट्टी ठिकाणांवरही धाडी टाकण्यात आल्या. या मोहिमेत ३ हजार लीटर रसायन, १५ लीटर हातभट्टी दारू, १८ लीटर देशी दारू, दहा लीटर विदेशी दारू व पाच लीटर बिअर जप्त करण्यात आली असून शुक्रवारी टाकलेल्या धाडीत एकूण ८० हजार ८०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, औरंगाबादचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, विभागीय भरारी पथकातील औरंगाबाद व राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

हॉटेलवरही कारवाया

दिनांक २३ जुलै रोजी पथकांनी धारूर तालुक्यातील अंबेगव्हाण, बीड तालुक्यातील नाळवंडी शिवार, आष्टी तालुक्यात खडकत, चिंचाळा शिवारातील हॉटेलवर तर कडा येथे सरकारी ओढ्याच्या काठावर छापे टाकून श्रीमंत थोरात, बळीराम गायके, नितीन जेवे, अशोक पोकळे आदींवर कारवाई केली.

240721\273124_2_bed_20_24072021_14.jpeg

कारवाई