मिरवट येथे कृषी सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST2021-03-28T04:31:20+5:302021-03-28T04:31:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांदूर : येथून जवळच असलेल्या मिरवट (ता. परळी) येथे जागतिक हवामान दिनानिमित्त आयोजित कृषी ...

Prize distribution of Agricultural General Knowledge Competition at Mirwat | मिरवट येथे कृषी सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण

मिरवट येथे कृषी सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क

घाटनांदूर : येथून जवळच असलेल्या मिरवट (ता. परळी) येथे जागतिक हवामान दिनानिमित्त आयोजित कृषी आधारित सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

गुरूवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, उ. कृ. अ. अशोक सोनवणे, प्रकल्प सहाय्यक अतिश चाटे, प्रताप मुंडे, प्रकल्प विशेषज्ञ-मनुष्यबळ विकास जयशिव जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कार्याला उजाळा दिला.

यावेळी बदलत्या हवामानाचा शेती उद्योगावर होत असलेला प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पाच्या महापोकरा या संकेतस्थळाला भेट देऊन प्रकल्पांतर्गत योजनांच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास केला. आपल्या अशिक्षित आई-वडिलांना त्याची माहिती देऊन संरक्षित शेती अंतर्गत शेडनेट, पॉलिहाऊस यांचा अवलंब, फळबाग लागवड, बीजोत्पादन आदी उपक्रम राबवण्यासाठी गावातील शेतकऱ्यांना परावृत्त करावे, तसेच पोकराच्या माध्यमातून हवामान अनुकूल तंत्रज्ञान गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी घेतलेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रशिक्षक राहुल मुंडे, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक संतोष तेलंग्रे, सरपंच राधाबाई साबळे, धुराजी साबळे, रतन इंगळे, भास्कर साबळे, गणेश साबळे, फुलचंद इंगळे, हनुमंत कोळी, संदिपान इंगळे, विष्णू भदाडे, संतोष भदाडे, बाबा भंडारे, मेघराज इंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

३० प्रश्नांची परीक्षा

जागतिक हवामान दिनानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी, त्यांचा न्यूनगंड कमी व्हावा. विद्यार्थ्यांनी कृषीविषयक ज्ञान आत्मसात करावे याकरिता तीस बहुपर्यायी प्रश्नांच्या कृषी आधारित सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन शिवप्रसाद येळकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. ही परीक्षा शेतीशाळा प्रशिक्षक राहुल मुंडे यांनी गावामध्ये आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या.

यांना मिळाली बक्षिसे

या परीक्षेत गावातील आलीजा साबेर पठाण, रामभाऊ भास्कर इंगळे, सोमेश्वर गणेश सिताबराव, शेख समीर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमेेेे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहनपर क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना शेतीशाळा प्रशिक्षक राहुल मुंडे यांच्या अर्थसहाय्यातून व कृषी विभागाकडून प्रशस्तीपत्र, ट्रॉफी, शालेय बॅग, रजिस्टर, स्केचपेन पॉकेट देऊन गौरविण्यात आले.

===Photopath===

270321\272_bed_1_27032021_14.jpg

===Caption===

मिरवट येथे कृषी आधारीत स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. 

Web Title: Prize distribution of Agricultural General Knowledge Competition at Mirwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.