आष्टीत जुगार अड्ड्यावर छापा; १५ जुगाऱ्यांवर विशेष पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:09 IST2019-05-15T00:08:35+5:302019-05-15T00:09:29+5:30
शिराळ शिवारातील शेतात जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल,अलिशान गाड्यांसह ३० लाखांचा माल जप्त केला.

आष्टीत जुगार अड्ड्यावर छापा; १५ जुगाऱ्यांवर विशेष पथकाची कारवाई
आष्टी : शिराळ शिवारातील शेतात जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल,अलिशान गाड्यांसह ३० लाखांचा माल जप्त केला. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांचे पथक सोमवारी आष्टीत दाखल झाले होते.
यादरम्यान त्यांना शिराळ शिवारातील पंजाब कासम आजबे यांच्या शेतात काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री ८ वाजता सदर शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला असता तिथे गोटिराम आजबे, कचरु आजबे, रमेश धोतरे, संजय वाल्हेकर, बाळासाहेब राळेभात, मच्छिंद्र मसाळकर, विलास कर्डुले, राजेंद्र वंजारे, नासीरखन गुलाबखन, बापु थोरात, महावीर भंडारी, विकास जगताप, लहु बहिर, पोपट पोकळे आणि रावसाहेब जगताप हे १५ जण गोलाकार बसून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळताना दिसून आले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख १ लाख १४ हजार २४० रुपये, एकूण ९४ हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल, सात दुचाकी तसेच आॅडी, स्कॉर्पियो या चारचाकी वाहनासह एकूण २९ लाख ३८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पो.ना. पांडुरंग देवकते यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर आष्टी पोलिसात गुन्हा नोंद झाला.
विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि रामकृष्ण सागडे, पोलीस कर्मचारी गणेश नवले, रेवननाथ दुधाने, अंकुश वरपे, पांडुरंग देवकते, हनुमान राठोड आदींनी केली.