बीड : येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची अखेर नागपूर कारागृहात बदली करण्यात आली आहे. कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर त्यांच्यावर आरोप होता. यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.
भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि जामिनावर बाहेर आलेल्या कैद्यांनी गायकवाड यांच्यावर हे गंभीर आरोप केले होते. कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे, नकार देणाऱ्या कैद्यांचा छळ करणे, भजन-आरती बंद करणे आणि महापुरुषांचे फोटो हटवून बायबलमधील श्लोक लावणे अशा तक्रारी होत्या. यापूर्वी गायकवाड यांच्यावर विनापरवाना वृक्षतोड आणि कैद्यांकडून खासगी वाहन धुवून घेतल्याचेही आरोप होते. या सर्व गंभीर आरोपांची पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षता पथकांनी कसून चौकशी केली. चौकशीचा अहवाल सादर झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊल उचलत गायकवाड यांची बीडमधून नागपूर येथील कारागृहात बदली केली आहे. या बदलीमुळे बीडच्या कारागृह प्रशासनातील वादावर सध्या तरी पडदा पडला आहे.
बदली नव्हे थेट निलंबन कराकारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर जळगावमध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर याच गायकवाड यांच्या काळात बीडमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला. याचे फोटो, व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यामुळे गायकवाड यांची केवळ बदलीच नव्हे तर त्यांना निलंबीत करावे, अशी मागणीही काही लोकांनी केली.
Web Summary : Beed jail superintendent Petras Gaikwad transferred to Nagpur following allegations of pressuring inmates to convert. Accusations include coercion, harassment, and replacing Hindu symbols with Bible verses. Earlier allegations involved illegal tree cutting and misuse of inmates. Inquiry led to the transfer; calls for suspension persist due to past crimes.
Web Summary : बीड जेल अधीक्षक पेट्रस गायकवाड का धर्मांतरण के दबाव के आरोपों के बाद नागपुर तबादला। आरोपों में उत्पीड़न और हिंदू प्रतीकों को बाइबिल के छंदों से बदलना शामिल है। पहले अवैध पेड़ कटाई और कैदियों के दुरुपयोग के आरोप थे। जांच के बाद तबादला; पिछले अपराधों के कारण निलंबन की मांग जारी।