शरद पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये होणार राष्ट्रवादीचा विजयी संकल्प मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 14:21 IST2018-09-15T14:20:45+5:302018-09-15T14:21:27+5:30
१ आॅक्टोबर रोजी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

शरद पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये होणार राष्ट्रवादीचा विजयी संकल्प मेळावा
बीड : शरद पवार यांच्या उपस्थितीत १ आॅक्टोबर रोजी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज येथे झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
संदीप क्षीरसागर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी शरद पवार हे ३० सप्टेंबर रोजी सायंकाळीच बीडमध्ये मुक्कामी येणार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असून हा मेळावा अभूतपूर्व होणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली. या पत्रपरिषदेस माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर आदी नेतेमंडळी उपस्थित होती. केंद्र आणि राज्य शासनाच्या नाकर्तेपणावर या मेळाव्यात आवाज उठविणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.