बीडमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:53 IST2018-04-14T00:53:10+5:302018-04-14T00:53:10+5:30
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शनिवारी जयंती आहे. त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच आंबेडकर प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. यावर्षी बीड शहरातून २२ मिरवणुका निघणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बीडमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी जय्यत तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शनिवारी जयंती आहे. त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच आंबेडकर प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. यावर्षी बीड शहरातून २२ मिरवणुका निघणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सर्वच नगर पालिकांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी विद्यूत रोषणाई करण्याबरोबरच स्वच्छता केली आहे. तसेच ज्या मार्गांवरून मिरवणुका निघणार आहेत, त्या मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. तसेच महावितरणनेही सर्वत्र विद्यूत रोषणाई केली आहे. या दिवशी वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची काळजी घेतली आहे.
या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या उपस्थितीत घेण्यात आली आहे. यामध्ये सर्व अधिकाºयांसह विविध संघटनांच्या पदाधिकाºयांना घ्यावयाची काळजी व इतर सुचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाºयांकडून सूचना
जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी शांतता बैठकीत विविध सुचना केल्या. यामध्ये डीजे वाजविण्याची डेसिबल मर्यादा आणि वेळेचे पालन, शहर स्वच्छता, विद्युत पुरवठा, पोलीस बंदोबस्त, वाहतुक नियमन, भेसळयुक्त पदार्थांची विक्री, अवैध दारु विक्री, महिला व मुलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची नियुक्ती आदींची नियूक्ती केल्याचे सांगितले. तर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाºयांना जयंती उत्सवाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.
अफवांवर विश्वास नको
सोशल मिडीयावरून वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात. काही लोक कसलीही खात्री न करता आलेला मेसेज पुढे फॉरवर्ड करतात, तर काहीजण लगेच यावर प्रतिक्रिया व्यक्त करतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.
जिल्ह्यात तगडा बंदोबस्त
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात विशेष पथकांसह तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी बंदोबस्तावर नियंत्रण ठेवणार असल्याचे डीएसबीचे सहायक पोलीस निरीक्षक एस.म्हेत्रेवाड व सहायक फौजदार आबा चक्रे यांनी सांगितले.
महिलांसाठी विशेष व्यवस्था
मिरवणूक पाहण्यासाठी आणि सहभागी होणाºयांमध्ये महिला, तरूणांची संख्या लक्षणिय असते. हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्यात महिलाांसाठी विशेष बंदोबस्त नेमला आहे. तसेच दामिनी पथकही नजर ठेवणार आहे. माजलगावात गस्तीबरोबरच महिला पोलीस कर्मचारी साध्या वेषांमध्ये मिरवणुकीत सहभागी होऊन गैरप्रकारांवर नजर ठेवतील, असे उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी सांगितले.