शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
3
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
4
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
5
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
6
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
7
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
8
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
10
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
11
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
12
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
13
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
14
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
15
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
16
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
17
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
18
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
19
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
20
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

शेतात साचले तळे; बीड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 3:31 PM

Return rains hit Beed district शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे.

ठळक मुद्देमांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढमाजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडले

बीड : जिल्ह्यातील सर्वच भागात शनिवारी दुपारपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस सुरु असताना रविवारी सकाळपासून जोर धरला. सायंकाळपर्यंतही पावसाच्या सरी कोसळतच होत्या. या पावसात खरिप हंगामातील पिकांची काढणी, मळणी सुरु असल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी काढून गंजी लावलेल्या सोयाबीन पाण्यात भिजले तर वेचणीसाठी आलेला कापूस भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे.

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून आक्टोंबर हिटच्या उन्हामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. मागील दोन दिवसांपासून आभाळ  भरुन येत होते. यातच शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. धारुर, शिरुर कासार, केज तालुक्यात विज पडल्याने एक शेतकरी ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी शनिवारी रात्रभर पाऊस पडत होता. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. बीड शहरासह सकाळी १० वाजता पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पाऊस सुरुच होता. गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरालाही पावसाने झोडपून काढले. यात गेवराई तालुक्यातील वेचणीला आलेल्या कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे काही काळासाठी गावांचा संपर्क तुटला होता. पूर ओसल्यानंतर वाहतुक पूर्ववत झाली.

धारुर तालुक्यातही जोरदार पासवसाने हजेरी लावली. वीज दोन ठिकाणी विज पडली.यात पहिल्या ठिकाणी बाजरीच्या गंजीवर पडल्यामुळे आग लागली. तर दुसऱ्या ठिकाणी पडलेल्या विजेमुळे एक म्हैस ठार झाली.  आष्टी तालुक्यातही सलग तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.  यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरलेल्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपाच्या हंगामातील काढणी केलेल्या आणि मळणी सुरु असलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. वडवणी तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामील पिकांची प्रचंड नासाडी केली. बाजरी, कापूस , सोयाबीन पीक हाता आलेले असताना हिरावून घेतल्याची परिस्थिती आहे. आष्टी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. आष्टी शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले आहे. माजलगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यातही तुफान पाऊस झाला.

१ जून ते ११ आॅक्टोबरपर्यंत ७३९.८ मि.मी. पाऊसबीड जिल्ह्यात पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ६३८.९० मिमी इतकी आहे. १ जून ते ११ आॅक्टोबर दरम्यान जिल्ह्यात एकूण ७३९.८ मिमी पाऊस नोंदला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२६ टक्के पाऊस झाला आहे. परतीच्या पावसामुळे मात्र हाती आलेल्या खरिपाच्या पिकांना फटका बसला तर रबीची पेरलेली बियाणे भिजून सडण्याचा  धोका वाढला आहे. 

धरणे पुन्हा ओसंडलीपरतीच्या पावसात अगोदरच भरलेली धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र जिल्ह्याभरात पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या माजलगाव धरणाचे तीन दरवाजे शनिवारी पहाटेच उघडण्यात आले. याशिवाय आष्टी शहराला पाणीपुरवठा करणारे ब्रम्हगांव तलाव तब्बल चार वर्षांनी भरला. याशिवाय इतर मध्यम, लघु आणि साठवण तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

माजलगाव धरणातून विसर्गपरतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने माजलगाव धरणाचे ११ दरवाजे सोमवारी सकाळी उघडण्यात आले. त्यातुन प्रतिसेकंद २२ हजार क्युसेसने पाणी सिंदफना पात्रात सोडण्यात येत आहे. मागील आठवड्यापर्यंत एक दरवाजातुन एक हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यात आता वाढ केली आहे. जास्त पाऊस झाला तरी नियोजन करण्यात आल्याची माहिती धरणाचे उपविभागीय अधिकारी सी. एम.झेंड, कनिष्ठ अभियंता बी.आर.शेख यांनी दिली आहे.

मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढकेज तालुक्यात शनिवारपासून झालेल्या धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मांजरा धरणातील पाणीसाठ्यात २०  सेंटिमीटरने वाढ झाली. धरणाच्या वरच्या बाजूस पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत असल्याची माहिती मांजरा धरणाचे सहायक अभियंता शहाजी पाटील यांनी लोकमतला दिली. शनिवारपासून झालेल्या पावसाचा रबीच्या पिकांना फायदा होणार असलातरी खरिपाचे हातचे आलेल्या पिकांना मात्र फटका बसला आहे. 

टॅग्स :BeedबीडRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी