'खोक्याला' घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरात पोहोचले; बीड पोलीस सतीश भोसलेची आजपासून चौकशी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 08:30 IST2025-03-14T08:27:28+5:302025-03-14T08:30:40+5:30

Satish Bhosale : सतोश भोसले या आरोपीला बीड पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे.

Police reach Chhatrapati Sambhajinagar with the satish bhosale Beed Police will question Satish Bhosale from today | 'खोक्याला' घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरात पोहोचले; बीड पोलीस सतीश भोसलेची आजपासून चौकशी करणार

'खोक्याला' घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरात पोहोचले; बीड पोलीस सतीश भोसलेची आजपासून चौकशी करणार

Satish Bhosale ( Marathi News ) : बीड पोलीस सतीश भोसले याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले आहेत. आजपासून सतीश भोसले याची बीड पोलीस चौकशी करणार आहेत. दोन दिवसापूर्वी बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने प्रयागराजमधून सतीश भोसले याला अटक केली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भोसले याला आज बीडमध्ये आणले आहे. 

सतीश भोसलेच्या पाडलेल्या घराला आग लावली! २०-२५ जणांनी हल्ला केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

काही दिवसापूर्वी सतीश भोसले याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सतीश भोसले एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे दिसत होते. यानंतर आणखी काही व्हिडीओ व्हायरल झाले होते, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून अटक केली. 

सतीश भोसले याला बीड पोलीस आज शिरुर येथील कोर्टात हजर करतील. कोर्टात आज त्याला कोठडी मागण्यात येईल. यानंतर पुढची प्रक्रिया होईल. रात्री उशीरा सतीश भोसले याला मुंबई विमानतळावर आणण्यात आले. यानंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आले. 

सतीश भोसलेच्या पाडलेल्या घराला आग लावली

 पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्यानंतर वनविभागाने सतीश भोसलेल्या घरावर बुलडोजर चालवला. गुरुवारी (१३ मार्च) दुपारी घर पाडण्यात आले. त्यानंतर रात्री २० ते २५ जणांनी घराला आग लावल्याची घटना घडली. काही लोकांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप सतीश भोसलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. यात काही जण जखमी झाले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

शिरूर कासार शहरापासून काही अंतरावर वनविभागाची जागा आहे. इथे एक वस्ती बसलेली होती. मात्र, सतीश भोसलेचे गुन्हे समोर आले. त्यानंतर वनविभागाने अतिक्रमण करून अनधिकृत बांधण्यात आलेल्या घरांना नोटीस बजावली होती. इतर लोकांनी दुसरीकडे स्थलांतर केले. तर सतीश भोसलेचे कुटुंबीय त्याच घरात राहत होते. 

Web Title: Police reach Chhatrapati Sambhajinagar with the satish bhosale Beed Police will question Satish Bhosale from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.