केकतसारणी शिवारातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; वीस जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 18:11 IST2021-01-29T18:01:03+5:302021-01-29T18:11:39+5:30

युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  केकतसारणी शिवारातील जुगार अड्डयावर छापा

Police raid on gambling adda in Kekatsarani Shivara; Twenty gamblers charged | केकतसारणी शिवारातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; वीस जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

केकतसारणी शिवारातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; वीस जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्दे७ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज जप्त

केज : युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  केकतसारणी शिवारातील जुगार अड्डयावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने गुरूवारी ( दि. २८ ) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास छापा मारला. यात २० जणांना ताब्यात घेऊन ७ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज जप्त केला. शुक्रवारी सकाळी २० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष पथकाने येऊन केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात अवैध धंदे जोरात सुरु असल्याचे उघड झाले आहे. 

‌तालुक्यातील केकतसारणी शिवारात रामधन करांडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अनेक दिवसांपासून पत्याचा जूगार अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकास मिळाली. यावरून सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे आणि कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने गुरूवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास सापळा रचून जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी २० जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रोख १ लाख २१ हजार सत्तर रूपये आणि इतर मुद्देमाल असा ७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी सहा वाजता युसुफवडगाव पोलीस ठाण्यात २० जुगाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पी. व्ही. कांदे करीत आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने येऊन केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारांकडे स्थानिक पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. 

या जुगाऱ्यांवर झाला गुन्हा दाखल :
राजाभाऊ आकुसकर (रा.आडस ता.केज), बाळासाहेब राऊत   (रा.चिंचोलीमाळी, ता. केज), लहु वाघमारे (रा.आडस), किसन जाधवर  (रा. रत्नापुर ता.कळंब), महादेव मस्के  (रा.भिमनगर ता.केज), श्रीराम केकाण (रा.केकाणवाडी), अमोल शेप (रा. लाडेवडगाव), बालासाहेब गालफाडे (रा. चिंचोलीमाळी), बाजीराव अंडील (रा. पाहाडी पारगाव), कलीम सय्यद (रा.अजीजपुरा केज), शीलवंत शिंदे (रा. लाडेवडगाव), सुरेश माने (रा. ब्रम्हणपुर ता.बीड), संतोष येवले  (रा.मादळमोही ता. गेवराई), अरुण माने (रा. ब्रम्हणपुर ता.बीड), कलीम शेख (रा. कोरडगाव ता.पाथर्डी  जि.अहमदनगर), दिलीप खरचन (रा. आखेगाव, ता.शेवगाव जि.अहमनगर), विष्णू ढोले (रा. आडस, मराठा गल्ली, आडस),  गोरख वायबसे (रा. कासारी, ता. केज), अशोक उजगरे ( रा.आसरडोह ता.धारुर) व  चरणदास काळे (रा.उमरत पारगाव ता.जि.बीड).

Web Title: Police raid on gambling adda in Kekatsarani Shivara; Twenty gamblers charged