मुंबई - काही दिवसांपूर्वी एका खासगी रूग्णालयात झालेल्या वादाची व्हिडिओ शुटिंग काढण्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमधील घटना ९ एप्रिल २०२१ रोजी घडलेली असून पदाधिकारी गयावया करत माफी मागत आहे तर पोलिस त्यास काठ्या तुटेपर्यंत मारहाण करत असल्याचे दिसले. आता, बियाणं खरेदी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याची माहिती दिली. सध्या राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मात्र, शेतकरी आणि शेतीविषयक वाहतूकीसाठी राज्य सरकारने व स्थानिक प्रशासनाने परवागनी दिली आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी पोलीस आणि सामान्य माणसू यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करुन शेतकऱ्याचे फोटो शेअर केले आहेत.
यापूर्वीही व्यक्त केला संताप दरम्यान, काहि दविसांपूर्वी जालन्यातील व्हायरल व्हिडिओवरुन वाघ यांची संताप व्यक्त केला होता. शिवराज नारियलवाले (रा. जालना) असे मारहाण झालेल्या त्या व्यक्तीचे नाव होते. या घडलेल्या एकूणच घटनेवरही चित्रा वाघ यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला होता. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये कोरोना महामारीतही रोज स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत. लोकांचे खुन होताहेत, तिथे दाखवा खाकीचा ज़ोर...गोरगरीबांवर जोर काढून काय साध्य करताय असा सवाल उपस्थित केला आहे.