शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

माणसं मेली, तक्रारी केल्या, चौकशीही झाली; निकाल मात्र दडपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

सोमनाथ खताळ बीड : कोरोनात उपचारातील हलगर्जीमुळे रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून डिझेलची चोरी करून लाखो रुपयांचा अपहार केला. कर्तव्यावर ...

सोमनाथ खताळ

बीड : कोरोनात उपचारातील हलगर्जीमुळे रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून डिझेलची चोरी करून लाखो रुपयांचा अपहार केला. कर्तव्यावर असणाऱ्या नर्सची वॉर्डबॉय छेड काढतो, अशा गंभीर प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रारी झाल्या. चौकशीसाठी समित्या नियुक्त केल्या; परंतु अद्याप एकाचाही निकाल न देता ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करून सर्व प्रकरणे दडपण्यात आल्याचे दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयातील या प्रकाराने आता संताप व्यक्त होत आहे. आता या तक्रारींच्या फाईल उघडणार की तशाच दडपून दोषींना पाठीशी घालणार, हे येणारी वेळच ठरविणार आहे.

प्रकरण क्रमांक १

जिल्हा रुग्णालयातील फिवर क्लिनिकमध्ये एका २६ वर्षांच्या मुलाला २४ तास उलटूनही सलाईनही लावले नाही, तसेच बेडही दिला नाही. या मुलाचा व्हरांड्यातच तडफडून मृत्यू झाला होता. या घटनेला जवळपास चार महिने झाले. याबाबत नातेवाइकांनी तक्रार केली; परंतु त्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे.

प्रकरण क्रमांक २

कोरोना वॉर्डमधील आयसीयू १ मधील एका नर्सला रात्री २ वाजेच्या सुमारास एका वॉर्डबॉयने आजूबाजूला कोणी नसल्याची संधी पाहून लगट करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याची तक्रारही नर्सने केली आहे. विनयभंगासारख्या या गंभीर प्रकरणातही अद्याप काहीच झालेले नाही.

प्रकरण क्रमांक ३

जननी सुरक्षा योजनेंतर्गत प्रसूती झालेल्या मातांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका आहेत; परंतु चालक व लेखापाल राऊत यांच्या संगनमताने जादा दराची पावती देऊन प्रत्यक्षात कमीच डिझेल टाकून एकावेळी जवळपास १२०० रुपयांची डिझेल चोरी केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने पुराव्यानिशी उघड केले होते. यातही राऊत व चालकाला पाठीशी घालून निकाल दडपण्यात आला.

प्रकरण क्रमांक ४

गेवराई तालुक्यातील एका महिलेच्या कोरोना चाचणीचा कसलाही अहवाल नसताना तिला बाधित असल्याचे सांगत नातेवाइकांवर गुन्हा नोंद केला. नातेवाइकांनी डॉक्टर, परिचारिकांसमाेरून मृतदेह नेला होता; परंतु तो पळविला, असे कारण देत अधिकाऱ्यांच्या दबावावरून गुन्हा नोंद झाला. याचीही चौकशी झाली; परंतु त्यातही पुढे काहीच झाले नाही. विशेष म्हणजे याच प्रकरणात मयताचा भाऊ ॲड. कबाडे यांनी याचिका दाखल केली आहे.

उपसंचालकांना बदल्यांमध्येच रस

उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्येच रस आहे. यात मोठी आर्थिक उलाढाल झाली असून, याचे काही पुरावेही हाती लागले आहेत. लातूर कार्यालयातील एका अधिकाऱ्याला हाताशी धरून ‘लाख’मोलाची कमाई होत असल्याने डॉ. माले यांचेही या चौकशींकडे दुर्लक्ष होत आहे. आर्थिक उलाढालीचे हे प्रकरण कागदावर येणार असून, लवकरच याचा पर्दाफाश होणार आहे. डॉ. माले यांची बाजू घेण्यासाठी संपर्क झाला नाही.

कोट

या सर्व प्रकरणांची माहिती घेतली जाईल. सर्व समित्यांना बोलावून याची तपासणी केली जाईल. दोषींवर कारवाई होईलच.

डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड