शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनी पंडितांच्या घरात घुसून मारहाण केली; मग पंडित बाप-लेकही पवारांच्या दिशेने धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:25 IST

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल : गेवराईतील घटनेत पंडितांच्या पीएचा जबाब नोंदविला

बीड : गेवराई नगरपरिषद निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पवार आणि पंडित कुटुंबातील संघर्ष विकोपाला गेला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. फुटेजमध्ये पवार गटातील काही लोकांनी थेट पंडित कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण केल्याचे दिसत आहे. या हिंसक घटनेनंतर पंडित कुटुंबातील वडील आणि मुलांनीही संतप्त होऊन थेट पवार गटाच्या घराच्या दिशेने धाव घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पंडितांच्या स्वीय सहायकाचा जबाब पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा नोंदवला आहे.

गेवराईत मतदानाच्या दिवशी २ ङिसेंबर रोजी पंडित आणि पवार गटात राडा झाला होता. यात एकमेकांच्या घरावर धावून जात वाहनांची तोडफोड झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत भाजपचे बाळराजे पवार, शिवराज पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जयसिंग पंडित, पृथ्वीराज पंडित यांच्यासह ४० ते ५० जणांवर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु यातील एकही आरोपी अटक केला नाही. मुख्य आरोपींना नोटीसवर सोडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

सीसीटीव्हीत काय काय दिसले?सकाळी १०:१८ वाजता एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. तिने काळ्या स्कॉर्पिओला धडक दिली. त्यानंतर पांढऱ्या गाडीतून ५ ते ८ जण उतरले आणि माजी आमदार अमरसिंह पंडितांच्या घरात घुसले. राडा केल्यानंतर १०:१९ वाजता आतून सर्वजण पळत आले आणि पुन्हा त्याच पांढऱ्या गाडीत बसून निघून गेले. १०:२४ वाजता पंडित समर्थकांच्या दोन काळ्या स्कॉर्पिओ गाड्या घराजवळ आल्या. १०:२५ वाजता पंडितांच्या घरातून एक जमाव पवारांच्या घराकडे गेल्याचे दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओत जयसिंग पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. हे दोघेही नात्याने सख्खे मेहुणे आहेत.

पंडित बंधूंनी घेतली एसपींची भेटआमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गुरुवारी दुपारी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली. त्यांनी घटनेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले.

आगोदरच एक गुन्हा दाखल असल्याने स्वतंत्र गुन्हा दाखल करणार नाही. जखमीचे प्रमाणपत्र पाहून नंतर कलमांची वाढ केली जाईल. अमृत डावकर यांचा जबाब घेतला आहे. समोरचेही जबाब देणार आहेत, असे समजले. यातील प्रमुख आरोपींना नोटीसवर सोडले आहे. अद्याप कोणालाही अटक नाही.- किशोर पवार, पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर बीड

English
हिंदी सारांश
Web Title : Pawar group assaults Pandit family; retaliation follows in Beed.

Web Summary : Clash erupted between Pawar and Pandit families during Gevarai election. CCTV footage shows assault on Pandit's home, followed by retaliation. Police filed case against 40-50 people, no arrests made.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड