पाटोदा तालुक्यात नणंद - भावजयीचा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 15:30 IST2018-10-09T15:29:53+5:302018-10-09T15:30:26+5:30
कपडे धुण्यासाठी गेलेल्या नणंद -भावजयीचा तलावातील डोहात बुडून मृत्यू झाला.

पाटोदा तालुक्यात नणंद - भावजयीचा तलावात बुडून मृत्यू
पाटोदा (बीड ) : दगडफोडीच्या कामानिमित्ताने तालुक्यातील आंबेवाडी येथे स्थिरावलेल्या कु-हाडे कुटुंबीयांवर एन सणासुदीच्या दिवसांत काळाची कु-हाड कोसळली. कपडे धुण्यासाठी गेलेल्या नणंद -भावजयीचा तलावातील डोहात बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेली दुर्घटना सायंकाळी उशिरा उघडकीस आली.
काजल बाळू कु-हाडे (19) आणि तिची नणंद सोनाली कु-हाडे असे बुडून मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. अमळनेर पोलिस ठाण्याच्या कक्षेतिल आंबेवाडी (पिंपळवंडी ) येथे कु-हाडे कुटुंबीय दगडफोडीच्या कामानिमित्ताने स्थिरावलेले आहे. सोमवारी बारा वाजण्याच्या सुमारास दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गावाजवळील तलावात गेल्या होत्या.
सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी आल्या नाहीत. यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता तलावातील पाण्याच्या डबक्यात दोघींचे मृतदेह आढळून आले.अमळनेरचे पोलिस उपनिरीक्षक गडवे यांनी घटनास्थळी भेट दिली.उत्तरीय तपासणी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली