परळीत भेळ विक्रेत्याला मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:38 IST2021-01-16T04:38:01+5:302021-01-16T04:38:01+5:30

बीड : पाणीपुरीचे पैसे मागितल्याने भेळ विक्रेत्याला तिघांनी मारहाण केली. त्यानंतर गल्ल्यातील दोन हजार रुपये हिसकावून पळ काढला. ही ...

In Parli, Bhel beat up the seller and looted | परळीत भेळ विक्रेत्याला मारहाण करून लुटले

परळीत भेळ विक्रेत्याला मारहाण करून लुटले

बीड : पाणीपुरीचे पैसे मागितल्याने भेळ विक्रेत्याला तिघांनी मारहाण केली. त्यानंतर गल्ल्यातील दोन हजार रुपये हिसकावून पळ काढला. ही घटना गुरुवारी परळी शहर पाेलीस ठाणे हद्दीत घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश्वर अशोक शिवगण (रा. माणिकनगर, परळी) असे भेळ विक्रेत्याचे नाव आहे. ते गुरुवारी एका खासगी हॉस्पिटलसमोरील गाड्यावर नेहमीप्रमाणे भेळ, पाणीपुरी विकत होते. दुपारी एक वाजता दुचाकीवरुन (क्र. एमएच ४४ - २०५५) दत्ता मुंडे (रा. कन्हेरवाडी, ता. परळी) व अन्य दोन अनोळखी तेथे आले. त्यांनी तीन पाणीपुरी खाल्ली व पाच पाणीपुरी पार्सल घेतली. त्यानंतर पैसे न देताच ते निघाले. यावेळी ज्ञानेश्वर यांनी पैशांची मागणी केली असता, ‘तुझे पैसे देत नाही, काय करायचे ते कर’ असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, शिवगण यांनी दुधाची उधारी देण्यासाठी दोन हजार रुपये गल्ल्यात ठेवले होते, ते बळजबरीने काढून घेत पुन्हा मारहाण केली. यावेळी त्यांच्याकडे कामाला असलेल्या ज्योतीराम कांबळे व शेजारच्या आईस्क्रीम विक्रेत्याने मध्ये पडत मारहाण थांबवली. त्यानंतर तिघांनीही तेथून दुचाकीवरुन धूम ठोकली. ज्ञानेश्वर शिवगण यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: In Parli, Bhel beat up the seller and looted