बीड : अमरावतीतील परतवाड्याची घटना ताजी असतानाच आता माजलगावातही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. शहरातील कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या घटनेला आता भीषण वळण मिळाले आहे. या प्रकरणात पीडितेचा न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला असून, आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला धर्मांतरासाठीही दबाव टाकल्याची माहिती समोर येत असून, माजलगावातही 'अमरावतीतील परतवाडा पॅटर्न'ची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे.
तालुक्यातील एका गावची १६ वर्षीय मुलगी माजलगावात ११ वीत शिक्षण घेते. २० एप्रिल रोजी तिच्या एका मैत्रिणीने प्रॅक्टिकल बुक नेले होते. ते परत देण्यासाठी मैत्रिणीने तिला 'बेकर्स लॉन्ज कॅफे'मध्ये बोलावले. तिथे गेल्यावर मैत्रीण नव्हती, मात्र त्याच महाविद्यालयात शिकणारा इंदिरानगर भागातील 'अब्दुल' (नाव बदलले आहे) हा तिथे हजर होता. त्याने मुलीचा हात धरून गैरवर्तन केले होते. याप्रकरणी २१ एप्रिल रोजी माजलगाव शहर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.
व्हिडिओ आणि चॅटिंगमधून फुटले बिंगपोलिस तपासादरम्यान पीडितेने न्यायालयात दिलेल्या जबाबात अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल जप्त केला असून, सायबर पोलिसांच्या मदतीने केलेल्या तपासणीत पीडितेचे अश्लील व्हिडिओ आणि संशयास्पद व्हॉट्सॲप चॅटिंग आढळले आहे. आरोपीने पीडितेवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचेही चॅटिंगवरून समोर येत आहे. याशिवाय, त्याच्या जाळ्यात इतर ५ ते ६ मुली अडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशीच घटना काही दिवसांपूर्वी अमरावतीतील परतवाडा येथे घडली होती, जिथे एका तरुणाने १८० अश्लील व्हिडिओ बनविले होते.
पोलिसांची माहिती देण्यास टाळाटाळहे प्रकरण अत्यंत संवेदनशील असूनही पोलिस प्रशासनाकडून माहिती देण्यास कमालीची गुप्तता पाळली जात आहे. पिंक पथकाचे प्रमुख सपोनि महेश भोसले यांनी दोन दिवस संपर्क करूनही प्रतिसाद दिला नाही, तर माजलगाव शहरचे ठाणेदार सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांनीही फोन उचलला नाही. सध्या आरोपी अब्दुल हा बीडच्या बालसुधारगृहात आहे.
कलमात वाढ अगोदर विनयभंग आणि आता अत्याचाराचे कलमात वाढ झाली आहे, हे खरे आहे. परंतु व्हिडिओ, चॅटिंगबाबत सर्व माहिती तपास अधिकारी यांच्याकडे आहे. मला त्याबाबत काही सांगता येणार नाही.-प्रल्हाद मुंडे, सहायक पोलिस निरीक्षक, माजलगाव शहर
Web Summary : In Majalgaon, a minor girl was lured, abused, and filmed. The accused pressured her for religious conversion. Police found explicit videos and chats, suspecting more victims. Echoes of Amravati's Paratwada case.
Web Summary : माजलगाँव में एक नाबालिग लड़की को बहला-फुसलाकर दुर्व्यवहार किया गया और उसका वीडियो बनाया गया। आरोपी ने उस पर धर्म परिवर्तन का दबाव डाला। पुलिस को स्पष्ट वीडियो और चैट मिले, जिससे और पीड़ितों का संदेह हुआ। अमरावती के परतवाड़ा मामले की प्रतिध्वनि।