परळीत चोरट्यांनी सराफा मार्केटमधील तीन दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 18:32 IST2018-10-29T18:32:03+5:302018-10-29T18:32:44+5:30
सराफ असोसिएशनने चोरट्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिसात निवेदन दिले आहे.

परळीत चोरट्यांनी सराफा मार्केटमधील तीन दुकाने फोडली
परळी (बीड ) : शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील सराफ मार्केटमधील तीन सोने चांदीचे दुकाने आज पहाटे चोरट्यांनी फोडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून सराफ असोसिएशनने चोरट्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिसात निवेदन दिले आहे.
आज पहाटे 4.45 च्या सुमारास चोरट्यांनी सराफा मार्केटमधील रविंद्र डहाळे, पप्पु जगदाळे व विजय डहाळे यांच्या मालकीची तीन दुकाने फोडून एक किलो चांदीचे दागिने चोरुन नेले. तसेच एका दुकानातील चार सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा चोरट्यांनी पळवुन नेले. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच सराफ असोसिएशनने पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांना निवेदन देऊन चोरट्यांन लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. यावेळी सराफा सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल टाक, सुरेश टाक, राजाभाऊ दहिवाळ, विश्वनाथ शहाणे, संतोष टाक, रमाकांत टाक, दत्ता दहिवाळ आदींची उपस्थिती होती. एकाच दिवशी तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.