परळी पोलिसांनी राजीनामा देऊन गुंडांच्या टोळ्या काढाव्यात; सुरेश धसांचा पुन्हा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:06 IST2025-01-31T12:03:56+5:302025-01-31T12:06:14+5:30

सगळे परळी पाेलिसांच्या बाबतीतच नव्हे तर बीडमधील पोलिसही कमी नाहीत.

Parali Police should resign and start gangs of goons; Another serious allegation by Suresh Dhasan | परळी पोलिसांनी राजीनामा देऊन गुंडांच्या टोळ्या काढाव्यात; सुरेश धसांचा पुन्हा गंभीर आरोप

परळी पोलिसांनी राजीनामा देऊन गुंडांच्या टोळ्या काढाव्यात; सुरेश धसांचा पुन्हा गंभीर आरोप

बीड : बीडपोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भाजपचे आ. सुरेश धस यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. बीडमध्ये पाेलिसांकडे स्वत:ची हायवा वाहने आहेत. परळीतील पोलिसांनी राजीनामा देऊन गुंडांच्या टोळ्या काढाव्यात, असा आरोप धस यांनी केला. पोलिसांवर वारंवार होत असलेल्या आरोपांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळत चालली आहे.

करुणा मुंडे यांच्या वाहनात पोलिसांनीच साड्या घालून वाहनात पिस्तूल ठेवली. काही पोलिसांचे १५ जेसीबी, १०० हायवा वाहने आहेत. सगळे परळी पाेलिसांच्या बाबतीतच नव्हे तर बीडमधील पोलिसही कमी नाहीत. बीडमध्येही पोलिसांच्या नावाने हायवा आहेत. कलेक्टरने लावलेल्या हायवा पोलिसच पळवतात, असा आरोपही आ. धस यांनी केला. तसेच पोलिसांनी होत नसेल तर नोकरीचा राजीनामा द्यावा आणि गुंडांच्या टोळ्या सुरू कराव्यात, असे सांगत पुन्हा एकदा पोलिसांवर निशाणा साधला.

पुरावा आल्यानंतर कारवाई करणार
आ.सुरेश धस यांनी वारंवार टीका करत पोलिसांवर निशाणा साधला. याबाबत पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जर कोणी पुरावे दिले तर आपण कारवाई करणार, असा इशारा दिला आहे. कोणालाही पाठीशी घालणार नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Parali Police should resign and start gangs of goons; Another serious allegation by Suresh Dhasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.