ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
भारतासह अनेक देशांनी कडक पाऊल उचलल्यावर कंपनीने ही कारवाई केली आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पीआरओच्या फोनवर नजर ठेवणं, त्यांचा नंबर बॅन करणं, त्यांच्या फोनवर बंदी आणणं, म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखंच असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला होता. ...
पृथ्वीचे तापमान वाढत आहे. हे तापमान कमी करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. हे पाणी परत आणण्यासाठी वृक्षारोपण व भूगर्भातील उपसा झालेल्या पाण्याचे पुनर्भरण झाले तरच तापमानातील समतोल राखला जाईल, असे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. ...
तलवारीने वाढदिवसाचा केक कापून घरी निघालेल्या एकास गजाआड करण्यात आले आहे. त्याच्याकडून तलवार जप्त केली असून पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री केली. ...
नगर पालिकेने उभारलेल्या मल्टीपर्पज मैदानाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिलेले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी दिला होता. ...
स्व. काकू, स्व. मुंडे यांनी आपल्या नेतृत्व आणि कर्तृत्वाने अखिल भारतीय ओळख निर्माण केली. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव नगर पालिकेच्या सभागृहाला देऊन संघर्षशील नेत्याचा सन्मान केला आहे. बीड शहराच्या विकासासाठी खंबीरपणे साथ देणार असल्याचे सांगून मुख्यमं ...