One dead, one injured in a car-auto rickshaw accident near Dharur | धारुरजवळ कार-ऑटोरिक्षा अपघातात एक ठार, एक जखमी
धारुरजवळ कार-ऑटोरिक्षा अपघातात एक ठार, एक जखमी

धारूर  (बीड ) : धारूरजवळ अंबेजोगाई रस्त्यावर कार आणि ऑटोरिक्षाच्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. मजीत बाबा असे मृताचे नाव असून जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरापासून एक किलोमीटर अंतरावर अंबेजोगाईकडे जाणारी कार ( एमएच २०  सी  एल ९०९८) आणि शहराच्या दिशेने येणाऱ्या एका ऑटोरिक्षामध्ये (एमएच २३- ८८१९ ) जोरदार धडक झाली. यात ऑटोरिक्षामधील मजीत बाबा (५०) जागीच ठार झाले. यात आणखी एकजण गंभीर जखमी आहे त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. 

ऑटोरिक्षामधील प्रवासी शहरातील एका लग्न कार्यासाठी येत होते. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 


Web Title: One dead, one injured in a car-auto rickshaw accident near Dharur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.