शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बदली कामगारांचा आक्रोश; सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न अवस्थेत काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 18:50 IST

न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जेष्ठता यादी तयार करून रिक्त जागेवर 29 दिवसांच्या तत्वावर आजतागायत आदेश मिळत आहेत.

अंबाजोगाई : जाचक अटी शिथिल करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालया मधील बदली कर्मचा-यांना सेवेत कायम करावे.  यामागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने मागील दहा दिवसापासून बदली कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरु आहे. मात्र सरकारने याची कुठलीच दखल घेतली नाही. यामुळे पुरुष बदली कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न होत मुंडन करत उपजिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढला.

स्वामी रामानंद तीर्थ  वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय अंबाजोगाई येथे 09/07/1999 रोजी दिलेल्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सन 2000 मध्ये 19 बदली कर्मचारी यांना कायम करण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जेष्ठता यादी तयार करून रिक्त जागेवर 29 दिवसांच्या तत्वावर आजतागायत आदेश मिळत आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे अंमलबजावणी होत आहे. परंतु, पुर्वी संचालक यांच्या पञानुसार रिक्त असलेल्या पदावर कायम केले जात नाही.

न्यायालयीन आदेशानुसार तयार केलेल्या जेष्ठता यादीमधील उर्वरित 214 कर्मचारी यांना 29 दिवसांच्या तत्वावर कोरोना, सारी, महाभयंकर व इतर रोगांच्या साथीमध्ये आवश्यकतेनुसार कामावर घेतले व रूग्णांची सेवा केली.1980 पासुन कार्यरत बदली कर्मचारी यांना सेवेत कायम केले नाही. यामुळे अंबाजोगाई येथील कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती ही बिघडत चालली आहे. 10 वर्षे व 240 दिवस भरले पहिजेत ही जाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. गेल्या 30 वर्षांपासुन बदली कर्मचारी यांची सेवेत कायम करण्याची मागणी अद्याप प्रलंबीत आहे. बदली कर्मचारी यांना न्याय द्यावा अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मोर्चात विलास काळुंके, शेख जमीर, दिलीप गालफाडे, सिमरन बक्ष, पुष्पा कचरे, उर्मिला शिंदे, प्रकाश कसबे, अशोक गायकवाड आदींचा सहभाग होता.  

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईhospitalहॉस्पिटल