शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागायची तिथे बहरत आहेत फळबागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:33 IST

नितीन कांबळे कडा : जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागायची तिथे आता फळबागा बहरत आहेत. शेततळी घेऊन आधुनिक शेती ...

नितीन कांबळे

कडा : जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागायची तिथे आता फळबागा बहरत आहेत. शेततळी घेऊन आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न कडा परिसरात होत आहे.

दुष्काळी भाग असलेला आष्टी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागायची तिथे शेतीला पाणी आणायचे कोठून असा प्रश्न कायम समोर असल्याने आणि पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. फळबाग शेती व हंगामी पिके घेताना पाण्याची चिंता भेडसावयची; पण कृषी विभागाच्या योग्य सल्ल्याने तालुक्यातील २,२९१ शेतकऱ्यांनी शेततळी खोदून या माध्यमातून शाश्वत शेती करण्यासाठी शेततळ्याचा मार्ग काढला. आता शेतकरी यामुळे अडचणीतून थोड्याफार प्रमाणात का होईना बाहेर पडताना दिसत आहे.

आष्टी तालुक्यातील शेतकरी शेतीला किंवा फळबागेला पाणी नसल्याने हंगामी पिकाला महत्त्व देऊन शेती करायचे; पण कृषी विभागाने वेळोवेळी जनजागृती करून विविध योजनांच्या माध्यमातून शेततळी खोदून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केल्याने मागील पाच वर्षांत तालुक्यातील २,२९१ एवढी शेततळे शेतकऱ्यांनी खोदून पाणीटंचाईवर मात करून पाच हजार एकर क्षेत्रावरील फळबागांची शेती उत्तम प्रकारे जोपासली आहे.

एरवी पाण्याअभावी फळबागा जळून जायच्या; पण आता पाण्याअभावी फळबागांना कसलीच भीती राहिली नाही. शेतकऱ्यांना शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा मार्ग मिळाला असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर शेततळे खोदून पाण्याचा साठा करून शेतशिवार बहरण्यासाठी पुढे यायला हवे. त्याचबरोबर पावसाळी हंगामातील पाण्याने शेततळी भरून घ्यायला हवीत.

कृषी विभागाचे वेळोवेळी सहकार्य आहेच. काही अडचण भासल्यास कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असे आवाहनदेखील आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.

तालुक्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेततळे उभारले. आज त्यामुळे कसलीच पाणीटंचाई भासत नसल्याचे व शेतीला पाणी भरपूर देता येत असल्याचे मातावळी येथील शेतकरी रामदास बांगर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

या योजनेतून खोदलेले शेततळे व शेततळ्याची संख्या

सामूहिक शेततळे ४७५

अस्तीकरणासहित शेततळे ३८

फक्त अस्तीकरण शेततळे ४१

फक्त खोदकाम केलेले शेततळे ४७६

मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळे १,२६१

===Photopath===

160421\20210410_102332_14.jpg