शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

शासनाकडून केवळ पोकळ घोषणा कृती मात्र शून्य; अशोक चव्हाण यांची बीड येथे टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:50 IST

शासन शेतकर्‍यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. कर्जमाफी असो अथवा जीएसटी, सर्वस्तरावर अंमलबजावणीत भाजप सरकार अपयशी ठरले आहे. केवळ पोकळ घोषणा मुख्यमंत्री करीत असून, कृती मात्र शून्य आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्र परिषदेत केला. काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने ते बीड येथे आले होते.

ठळक मुद्देकाँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने ते बीड येथे आले होते.यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम, खा. रजनी पाटील, काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी आदींची उपस्थिती होती.

बीड : शासन शेतकर्‍यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. कर्जमाफी असो अथवा जीएसटी, सर्वस्तरावर अंमलबजावणीत भाजप सरकार अपयशी ठरले आहे. केवळ पोकळ घोषणा मुख्यमंत्री करीत असून, कृती मात्र शून्य आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्र परिषदेत केला. काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने ते बीड येथे आले होते.

यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम, खा. रजनी पाटील, काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी युती सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. बोंडअळीने शेतकरी पूर्णत: अडचणीत आला, त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. कर्जमाफी केल्याचा आव शासन करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र कुणालाही कर्जमाफी झाली नाही. पीक विम्याचे पैसे मिळेनात, हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. तर इकडे मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग परेशान आहे. या दोघांचे प्रश्न सोडविण्याऐवजी शासनाने मंत्रालयात आत्महत्या रोखण्यासाठी जाळी बसविली. अशा जाळ्या कुठे-कुठे बसविणार? असा प्रश्न उपस्थित करुन ते म्हणाले,  प्रश्न जर वेळेत सुटले तर आत्महत्या आटोक्यात येतील. पूर्ण महाराष्ट्रात  एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चे काढले, पावणे दोन लाख पदे रिक्त असतानाही ती भरली जात नाहीत. त्यामुळे बेरोजगारात असंतोष आहे. पदे रद्द न करता जागा भराव्यात, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची तयारी झाली आहे. आघाडी करायची की नाही? याचा निर्णय बाकी असून, चर्चा चालू आहे, नेहमीपेक्षा वेगळा फार्म्यूला काय करता येईल? यासाठी मंथन चालू आहे. आघाडीच्या संदर्भात २२ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, त्यात यावर चर्चा होईल, असे ते म्हणाले. लातूर, उस्मानाबाद आणि बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यावेळी बीडला संधी मिळणार काय? असे विचारले असता ते म्हणाले, या संदर्भातही चर्चा होणार आहे. बीड जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. याच पत्र परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शासनावर टीका केली. शेतकर्‍यांचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसBeedबीड