विडा येथे मारहाणीत एकाचा मृत्यू; तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:31 AM2019-11-19T00:31:22+5:302019-11-19T00:31:25+5:30

विडा येथे भांडणात एकाचा मृत्यू झाला असून मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला

One killed in beating at Vida; FIR against all three | विडा येथे मारहाणीत एकाचा मृत्यू; तिघांविरुद्ध गुन्हा

विडा येथे मारहाणीत एकाचा मृत्यू; तिघांविरुद्ध गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील विडा येथे भांडणात एकाचा मृत्यू झाला असून मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयतासह त्याचे भाऊ आणि वडिलांच्या विरोधात अ‍ॅट्रासिटी व मारहाणीचा असे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यातील विडा येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजता धनराज गोपीनाथ गायकवाड (वय ५० वर्ष) यास नंदा माने व तिचा मुलगा करण माने व त्यांचा नातेवाईक संतोष अहिरे यांनी लाकडी दांड्याने मारहाण केली. मारहाणीत धनराज खाली पडताच त्याच्या छातीवर पोटावर आणि अवघड ठिकाणी या तिघांनी जबर मारहाण केली. यात धनराज बेशुद्ध झाले होते. त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेला धनराज याचा भाऊ शामसुंदर गायकवाड व शुभांगी गायकवाड यांना ही मारहाण करण्यात आली .
नंदा माने यांची विवाहित मुलगी ही तिच्या नवºयासोबत सासरी नांदत नसून ती धनराज गायकवाड याचा मुलगा शुभम गायकवाड यांच्या सोबत पळून गेली होती. तिला तिच्या नवºयापासून पाच वर्षाची एक मुलगी देखील आहे. त्याचा राग मनात धरून आणि आमची मुलगी आमच्याकडे द्या म्हणून नंदा माने, तिचा मुलगा व संतोष अहिरे यांनी धनराज गायकवाड यांच्या कुटुंबियांसोबत भांडण झाले
भांडणात झालेली मारहाण धनराज याच्या मृत्यूस कारणीभूत असून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध मयताची पत्नी शुभांगी धनराज गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन केज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, रविवारी झालेल्या भांडणातून मंदा माने हिने केज पोलीस स्टेशनला रविवारी मयत धनराज गायकवाड, त्यांचा भाऊ शामसुंदर गायकवाड आणि वडील गोपीनाथ किशन गायकवाड यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले हे करीत आहेत.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले
या प्रकरणात मयत झालेले धनराज गायकवाड यांची पत्नी शुभांगी हिने पतीच्या वियोगामुळे रात्री दोनच्या सुमारास गावाजवळच्या विहिरीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु त्याची चाहूल लागताच रात्रीच्या गस्तीवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे आणि पो.ना. अमोल गायकवाड यांनी तिचे प्राण वाचविले.
गुन्हा दाखल होईपर्यंत घेतले नाही प्रेत ताब्यात
आरोपीविरुद्ध पोलिसात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाहीत,असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतरच पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी देण्यात आले.

Web Title: One killed in beating at Vida; FIR against all three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.