चारचाकीच्या धडकेत एक ठार; दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 01:02 IST2019-07-08T01:02:49+5:302019-07-08T01:02:52+5:30

जीपला अचानक दुचाकीस्वार आडवा आल्याने जीप चालकाने ब्रेक मारले. त्यामुळे जीपने तीन कोलांट्या मारल्या. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून जीपमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

One killed in accident; 2 injured | चारचाकीच्या धडकेत एक ठार; दोन जखमी

चारचाकीच्या धडकेत एक ठार; दोन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : जीपला अचानक दुचाकीस्वार आडवा आल्याने जीप चालकाने ब्रेक मारले. त्यामुळे जीपने तीन कोलांट्या मारल्या. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून जीपमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना कल्याण-विशाखापट्टणम- महामार्गावर फुलसांगवी फाटा येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
सदरील जीप पाडळसिंगीकडून पाथर्डीकडे (एम.एच.२३ ए.डी ३०९२) जात होती. फुलसांगवी फाट्याजवळ दुचाकी (एमएच १७ डब्ल्यू ६४३०) जीपला आडवी आली. दुचाकीला चुकवण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक मारल्याने जीपने तीन कोलांट्या मारल्या. मात्र, दुचाकीस्वार अर्जून रावसाहेब राख यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गेवराई तालुक्यातील सहारा बालग्राममधील संतोष गर्जे, दीपक कुटे आणि सुलेमान (परभणी) हे जखमी झाले. संतोष गर्जे यांना जास्त जखमी असल्यामुळे त्यांच्यावर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: One killed in accident; 2 injured