शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:36 IST2019-01-17T00:34:17+5:302019-01-17T00:36:05+5:30
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मतदारसंघातील शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून मतदारसंघातील शेतक-यांना सिंचनाकडे घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी केले.

शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणणार
केज : शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मतदारसंघातील शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून मतदारसंघातील शेतक-यांना सिंचनाकडे घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी केले.
तालुक्यातील धनेगाव येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत होळ ते इस्थळ, इस्थळ ते धनेगाव, धनेगाव ते धनेगाव फाटा, रामा ते बोरगाव, भोपला या रस्त्यांसह वरपगाव येथील तीन कोटी रुपयांच्या पुलासह केज मतदारसंघातील बावीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना सोमवारी प्रारंभ झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण सभापती संतोष हंगे होते. यावेळी गटनेते हारु ण इनामदार, पंजाब देशमुख, दत्ता धस, किशोर थोरात, बप्पा डोंगरे, अशोक काकडे, तुकाराम गोरे, दिलीप भिसे ,सुधीर रानमारे, सदाशिव चाटे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आ. ठोंबरे म्हणाल्या, उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी मांजरात आणण्यासाठीच्या सर्वेक्षणासाठी पंधरा कोटी रु पये मंजूर झाले असून त्याचे सर्वेक्षण सुरु आहे. मतदारसंघातील शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणण्यासाठी आपण पाठपुरावा करत असून शंभर टक्के शेती सिंचनाखाली आल्यानंतर शेतकरी आर्थिक सक्षम होतील असे त्या म्हणाल्या.
यावेळी समाज कल्याण सभापती संतोष हांगे, हारु न इनामदार यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.