शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

नर्सचा कारनामा; परवानगी नसताना ४५ वर्षांखालील लोकांना टोचली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST

बीड : आठवडाभरापासून कंत्राटी नर्सेस चांगल्याच वादग्रस्त ठरत आहेत. जिल्हा रुग्णालयातील नर्सेसचे प्रकरण शांत होत नाही तोच अंमळनेर प्राथमिक ...

बीड : आठवडाभरापासून कंत्राटी नर्सेस चांगल्याच वादग्रस्त ठरत आहेत. जिल्हा रुग्णालयातील नर्सेसचे प्रकरण शांत होत नाही तोच अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका नर्सने नवा कारनामा केला आहे. ४५ वर्षांखालील कोरोना लसीकरण असतानाही केवळ ओळखीच्यांना 'अर्थ'साहाय्य करीत दोघांना लस टोचल्याचे रविवारी समोर आले आहे. याबाबत संबंधित नर्सला नोटीस बजावली असून कारवाईची टांगती तलवार तिच्यावर आहे.

सध्या कोरोना लसीचा सर्वत्र तुटवडा जाणवत आहे. लस कमी येत असल्याने बीड आरोग्य विभागाने १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण बंद ठेवलेले आहे. केवळ ४५ वर्षांवरील लोकांना लस दिली जात आहे; परंतु अंमळनेर आरोग्य केंद्रातील एका कंत्राटी नर्सने स्वत:चा मनमानी कारभार करीत नियमबाह्य लसीकरण केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार समजताच या भागाचे जिल्हा परिषद सदस्य माउली जरांगे यांनी तालुका आरोग्याधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याबाबत टीएचओंनी याबाबतचा अहवाल डीएचओंकडे पाठविला आहे. आता या नर्सला नोटीस बजावण्यात आली असून २४ तासांत खुलासा घेऊन अहवाल टीएचओंच्या अभिप्रायासह सादर करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिल्या आहेत. आता ही नर्स चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, तिच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. आता डीएचओ काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य माउली जरांगे म्हणाले, अंमळनेर आरोग्य केंद्रातील प्रकाराबाबत मी आपल्याला सायंकाळी सहा वाजता सविस्तर सांगेन. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत त्यांनी संपर्क साधला नाही.

...

नर्सेसबद्दल तीव्र रोष

मृतदेह पळविला म्हणून नातेवाइकांवर गुन्हा दाखल करणे, ऑक्सिजन पुरवठ्यात जबाबदारी झटकणाऱ्या नर्सेस अगोदरच वादात सापडलेल्या आहेत. आता ग्रामीण भागातील नर्सेसचेही कारनामे समोर येत आहेत. विशेष म्हणजे या सर्व वादग्रस्त नर्सेस कंत्राटी आहेत. यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची बदनामी होत असून त्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.

--

संबंधित नर्सबद्दल तक्रार आली आहे. टीएचओंकडून अहवाल मागविला आहे. नर्सला नोटीस बजावली असून तिला २४ तासांत खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. दोषी असल्यास कारवाई केली जाईल.

-डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्याधिकारी, बीड.