शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

परळीचे महादेव मुंडेच काय, पण बीडमधील या चार खुनांचा पोलिसांना होईना उलगडा?

By सोमनाथ खताळ | Updated: February 4, 2025 12:14 IST

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील गंभीर गुन्हे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

बीड : २०२३ मध्ये जिल्ह्यात ६४ जणांची हत्या झाली. यातील ६० गुन्हे उघड झाले, परंतु अद्यापही चार गुन्हे उघड झालेले नाहीत. सध्या तरी परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचीच चर्चा सुरू असून, इतर तीन खुनांबाबत कोणीही ब्र शब्द काढत नाही. पोलिसांनाही हे गुन्हे उघड करून मारेकरी कोण? याचा तपास लावण्यात अपयश आले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून जिल्ह्यातील गंभीर गुन्हे चव्हाट्यावर येऊ लागले. २०२३ मध्ये ६४ खुनांचे गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये यात घट होऊन तो आकडा ४० वर आला. हे सर्व गुन्हे उघड करण्यातही बीड पोलिसांना यश आले, परंतु २०२३ मधील गुन्ह्यांना दोन वर्षे उलटले, तरी अद्यापही त्यातील मारेकरी शोधण्यात बीड पोलिस यशस्वी झालेले नाहीत. सध्या परळीतील महादेव मुंडे या खून प्रकरणाची राज्यभर चर्चा होत आहे. भाजपचे आ. सुरेश धस यांनी यात अनेक गंभीर आरोपही केले. त्यामुळे याचा तपास अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी चाेरमले यांच्याकडे देण्यात आला, परंतु इतर तीन गुन्हे अद्यापही उघड झालेले नाहीत. त्यांच्या तपासाचे आणि मारेकऱ्यांचे काय?, त्यांच्याबाबत कोणीही ब्र शब्द काढत नाही. पोलिसांकडून हे प्रकरण कायम तपासावर ठेवून याची फाइल जवळपास बंद केली आहे. त्यामुळे नेकनूर, अंभोरा आणि बर्दापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अजूनही मोकाटच आहेत.

२०२१, २०२२ मधील खूनही अनडिटेक्ट२०२१ साली माजलगाव शहर (एफआयर क्रमांक - ३८९/२०२१) आणि २०२२ साली अंबाजोगाई ग्रामीण (एफआयर क्रमांक - ४४/२०२२) पोलिस ठाण्यातील खुनाचे गुन्हे उघड झालेले नाहीत. चाेरी, घरफोडी या गुन्ह्यांच्या तपासाचा टक्काही असमाधानकारक आहे. त्यात खुनाचे गुन्हेही उघड होत नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांकडून मात्र योग्य तपास झाल्यासचा दावा करत ‘अ फायनल’, म्हणजेच कायम तपासावर असल्याचे सांगत दुर्लक्ष केले जात आहे.

प्रकरण १पोलिस ठाणे - बर्दापूरएफआयर क्रमांक - २०/२०२३दिनांक - १२ फेब्रुवारी २०२३हकीकतअंबाजोगाई तालुक्यातील बाभळगाव येथील काशिनाथ बारीकराव उजगरे (वय ६०) यांचा ८ ते ११ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान अज्ञात व्यक्तीने कशानेतरी गळा आवळून खून केला होता. पत्नी पंचशिला उजगरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.

प्रकरण २पोलिस ठाणे - अंभोराएफआयर क्रमांक - २३/२०२३दिनांक - १९ फेब्रुवारी २०२३हकीकतआष्टी तालुक्यातील वेलतुरी शिवारात १६ फेब्रुवारी २०२३ रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता, त्याला गळा आवळून मारल्याने नाक, तोंडातून रक्त आले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला, परंतु त्याची ओळख पटली नाही. मृतदेह ओळखण्यातच अपयश आल्याने मारेकरी अद्यापही मोकाटच आहे. हवालदार लुईस पवार यांनी या प्रकरणात फिर्याद दिलेली आहे.

प्रकरण ३पोलिस ठाणे - नेकनूरएफआयर क्रमांक - १२७/२०२३दिनांक - २४ मे २०२३हकिकतबीड तालुक्यातील कवलीवस्ती मुळूकवाडी येथील गोरख ढास यांचा मृतदेह २६ मे २०२३ रोजी घरामागील नांगरटीत आढळून आला होता. त्यांच्या डोक्यात दगड मारून खून करण्यात आला होता. शिवाय बाजूला मेलेली काेंबडी आणि एक पिशवीही आढळली होती. पत्नी रूक्मिनबाई ढास यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. याचा तपासही अद्याप लागलेला नाही.

प्रकरण ४पोलिस ठाणे - परळी शहरएफआयर क्रमांक - १९१/२०२३दिनांक - २२ ऑक्टोबर २०२३हकिकतपरळी शहरातील बँक कॉलनी भागातील महादेव मुंडे (वय ३८) यांचा २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याप्रकरणी अशोक मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. अद्यापही यातील मारेकरी शोधलेले नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड