मराठा आरक्षण मिळेपर्यंत अंत्यविधी नाही; अंबाजोगाईत मृत मराठा आंदोलकाचे कुटुंब ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 13:41 IST2023-10-28T13:40:24+5:302023-10-28T13:41:06+5:30
अंबाजोगाईतील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ठेवले पार्थिव,अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी

मराठा आरक्षण मिळेपर्यंत अंत्यविधी नाही; अंबाजोगाईत मृत मराठा आंदोलकाचे कुटुंब ठाम
अंबाजोगाई: तालुक्यातील गिरवली येथील तरुण शत्रुघ्न काशीद यांनी मराठा आरक्षण देण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली.आज सकाळी स्वा.रा.ती.रुग्णालयात शवविच्छेदनानंतर काशीद यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ठेवण्यात आले आहे.
चौकात अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा कुटुंबाचा निर्णय आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तोडगा काढावा.अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हजारोंच्या संख्येने समाज बांधव जमा होत आहेत.