अंबाजोगाईत नवविवाहितेची आत्महत्या; घातपात असल्याचा नातेवाईकांना संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:41 IST2018-04-16T16:41:59+5:302018-04-16T16:41:59+5:30
उजनी पाटी येथील अनिता अनिल मुरकुटे (वय २१) या विवाहितेने रविवारी रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

अंबाजोगाईत नवविवाहितेची आत्महत्या; घातपात असल्याचा नातेवाईकांना संशय
अंबाजोगाई (बीड ) : तालुक्यातील उजनी पाटी येथील अनिता अनिल मुरकुटे (वय २१) या विवाहितेने रविवारी रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
मयत अनिताचा विवाह मागील वर्षीच अनिल मुरकुटे याच्यासोबत झाला होता. अनिलचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी (दि.१५) रात्री ११ वाजताच्या सुमारास अनिताने मुरकुटवाडी शिवारातील एका शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.
अनिताचे माहेर लातूर जिल्ह्यातील वंजारवाडी येथील असून तिचे आई-वडील कामानिमित्त चेन्नईला असतात. घटनेची माहिती मिळताच ते गावाकडे येण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, अनिताने आत्महत्या केली नसून काहीतरी घातपात झाला असावा अशी शंका तिच्या माहेरकडील नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.