चारित्र्याच्या संशयावरून पुतण्याचा चुलतीवर कोयत्याने वार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 19:33 IST2018-04-13T19:33:16+5:302018-04-13T19:33:16+5:30

चुलतीच्या चारित्र्यावर संशय घेत पुतण्याने तिच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान सावरगाव येथे घडली.

nephew attacks on aunt by Coinciding with the character's suspicion | चारित्र्याच्या संशयावरून पुतण्याचा चुलतीवर कोयत्याने वार 

चारित्र्याच्या संशयावरून पुतण्याचा चुलतीवर कोयत्याने वार 

माजलगाव  (बीड ) : चुलतीच्या चारित्र्यावर संशय घेत पुतण्याने तिच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान सावरगाव येथे घडली. घटनेनंतर आरोपी अर्जुन नाईकनवरे ग्रामीण पोलीस स्थानकात जाऊन आत्मसमर्पण केले. 

शहरापासून जवळच असलेल्या सावरगाव येथे नाईकनवरे हे संयुक्त कुटुंब राहते. अर्जुन गंगाधर नाईकनवरे हा याच परिवारातला आहे. मागील ५ फेब्रुवारीस त्याच्या बहिणीचे लग्न झाले. यावेळी त्याची चुलती जया अंगद नाईकनवरे (35) या एका व्यक्तीस बोलत असल्याचे अर्जुन याने पाहिले. तेव्हा पासून तो त्यांच्याकडे संशयाने पाहत असे मात्र घरात सर्वजण असल्याने तो त्यांना काही बोलू शकला नाही. 

आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्याची चुलती घरात एकट्याच टीव्ही पाहत होत्या. ही संधी साधत अर्जुनने पाठीमागून येत त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला तेव्हा त्या मोठ्याने ओरडल्या असता त्याने दुसरा वार त्यांच्या मानेवर केला. जया यांच्या आवाजाने घरातील लोक जमा झाले तेव्हा अर्जुनने तेथून पळ काढला. यानंतर अर्जुनने थेट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मिर्झा वाहब बेग हे करत आहेत. दरम्यान जया या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: nephew attacks on aunt by Coinciding with the character's suspicion