शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शेती, औद्योगिक विकासासाठी नदीजोड प्रकल्प काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:36 AM

सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत तथा पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त महासंचालक डॉ.दि.मा.मोरे यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नदीजोड प्रकल्प राबविल्यास शेतीसह औद्योगिक विकास होऊन ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत तथा पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त महासंचालक डॉ.दि.मा.मोरे यांनी केले.येथे भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता आबासाहेब कोकाटे उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले, मराठवाडा व पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ग्रामीण भागासाठी नदीजोड प्रकल्पाची मोठी गरज आहे. नदीजोड ही योजना पूर्वापार चालत आलेली असून इतिहास काळातही याचा उल्लेख आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.अधीक्षक अभियंता आबासाहेब कोकाटे म्हणाले, अवर्षणप्रवण मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्प निश्चितपणे उपयुक्त ठरेल. तसेच कृष्णा खोऱ्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.उपअभियंतापदी पदोन्नती मिळालेले सुनील अपसिंगेकर, बंग, वेडे यांच्यासह मिलिंद चिंचपूरकर यांना क्रेडाई व रोटरी तर्फे आदर्श अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. महेश कुलकर्णी यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक उत्तमराव मिसाळ, संच्वालन नितीन गोपन यांनी केले. संजय खंदाट यांनी आभार मानले. उत्तमराव मिसाळ, कुलदीप धुमाळे, बलभीम जाहेर पाटील, प्रकाश भांडेकर, पांडूरंगराव तोंडे, सतीश देशपांडे, हरिकिशन सारडा, त्रिंबक देशपांडे, केंडे, देविदास वारकरी, रमेश भालेराव, रावसाहेब वजुरकर, आल्हाद पालवनकर, राहुल बोरा आदींसह नागरिक उपस्थित होते.नदीजोड शक्य मात्र खर्चिकनदीजोड योजना अजिबात अशक्य नाही मात्र खर्चिक असल्याने शासन तिजोरीवर बोजा येणारी आहे. शेतीपेक्षा उद्योगधंद्यावर भर देण्याबाबत सर विश्वेश्वरैय्या यांनी त्या काळी अनेक योजना सांगितल्या आहेत. पर्जन्यमान जास्त असलेल्या कोकणातील वाहून जाणारे आणि समुद्राला मिळणारे पाणी तसेच पूर्व महाराष्ट्रातील नद्यांचे जास्तीचे पाणी मराठवाड्याकडे वळविणे शक्य असल्याचे डॉ.मोरे यांनी प्रोजेक्टरद्वारे नकाशासहीत सांगोपांग विवेचन केले.

टॅग्स :riverनदीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी