Walmik Karad : 'कोठडीत २४ तास मदतनीस हवा', वाल्मीक कराडची न्यायालयात मोठी मागणी; कोर्टाने काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:20 IST2025-01-03T13:20:07+5:302025-01-03T13:20:55+5:30
Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने अन्य आरोपींना पडकण्यासाठी पथके बनवली आहेत.

Walmik Karad : 'कोठडीत २४ तास मदतनीस हवा', वाल्मीक कराडची न्यायालयात मोठी मागणी; कोर्टाने काय सांगितलं?
Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने वाल्मीक कराड याची चौकशी सुरू आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी कराड याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. कोर्टाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच दिवशी वाल्मीक कराड याने कोर्टाकडे २४ तास एका मदतनीसाची मागणी केली होती. ही मागणी कोर्टाने फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मीक कराड याला ३१ डिसेंबर दिवशी रात्री बीड येथील कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने कराड याला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. यानंतर कराड याने पोलिसांकडे काही सुविधांच्या मागण्या केल्या होत्या. कोठडीत आपल्याला २४ तास मदतनीस मिळावा अशी मागणी त्याने केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे.
Walmik Karad : वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या, देशमुख हत्या प्रकरणी विष्णू चाटेने थेट कबुलीच दिली
वाल्मीक कराड याने आपल्याला स्लीप अॅप्रिया हा आजार असल्याचे सांगितले आहे. या आजारामध्ये झोपताना मशीन लावावी लावण्याची गरज असते. यात ऑटो सीपॅप ही मशीन लावावी लागते. ती मशीन हाताळण्यासाठी २४ तास एक मदतनीशाची आवश्यक्ता असते. यासाठी एक मदतनीस देण्यात यावा अशी मागणी कराड याने केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावल्याचे सांगण्यात येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विष्णू चाटे याने दिली कबुली
वाल्मीक कराड याने पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर संभाषण केले होते, अशी कबुली विष्णू चाटे याने चौकशीत दिली आहे. विष्णू चाटे याच्या मोबाईलवरुन पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते. दरम्यान, आता विष्णू चाटेने याबाबत कबुली दिली आहे. याबाबतचा अहवाल सीआयडीने न्यायालयात अहवाल सादर केला आहे.