'मै झुकेगा नही...', बीडचे आमदार संदीप क्षिरसागरांचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 12:10 PM2022-02-13T12:10:23+5:302022-02-13T12:28:36+5:30

विविध अभिनेते, क्रिकेटपटूंसह राजकारण्यांवरही पुष्पा चित्रपटाने भुरळ घातली आहे.

NCP MLA Sandeep Kshirsagar's video goes viral, says Pushpa film dialogue | 'मै झुकेगा नही...', बीडचे आमदार संदीप क्षिरसागरांचा व्हिडीओ व्हायरल

'मै झुकेगा नही...', बीडचे आमदार संदीप क्षिरसागरांचा व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

बीड- अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा (Pushpa) चित्रपटाने देशात धुमाकूळ घातला आहे. विविध अभिनेते, क्रिकेटपटूंसह राजकारण्यांवरही पुष्पा चित्रपटाने भुरळ घातली आहे. अनेकजण या पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणताना दिसत आहेत. आता बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षिरसाकर हेदेखील यात कमी नाहीत.

बीडमध्ये एका सभेला संबोधित करताना संदीप क्षिरसागर यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हटला. यावेळी संदीप क्षिरसागर आगामी निवडणुकांबाबत बोलत होते. यावेळी त्यांनी पुष्पा स्टाईल 'मैं झुकेगा नही...' असं म्हणताच समोर बसलेल्या जमावातून मोठा जल्लोष झाला.

'निवडणुकीत सर्वजण एकत्र लढणार आहेत. माझ्या पाठिशी तरुण वर्ग आहे, आई-बहीणींचा आशिर्वाद आहे, असेही संदीप क्षिरसागर यावेळी म्हणाले. दरम्यान, संदीप क्षिरसागर यांच्या आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील भाजपला टोला लगावताना 'झुकेंगे नही', असं म्हटलं होतं. यावरुन पुष्पाची क्रेझ राजकारण्यांमध्येही असल्याचे दिसून येत आहेत.

कोण आहेत संदीप क्षिरसागर ?
संदीप क्षिरसागर हे राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांचे पुतणे आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जयदत्त क्षिरसागर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांचे पुतणे संदीप क्षिरसागर यांना बीडमधून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत पुतण्याने काकाचा अवघ्या 1984 मतांनी धक्कादायक पराभव केला होता. 

Web Title: NCP MLA Sandeep Kshirsagar's video goes viral, says Pushpa film dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.