शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

नवरत्नांचा पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 11:46 PM

श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांचे कार्य हे महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचाराची परंपरा या कार्यक्रमातून पहायला मिळत आहे. गौरव मातृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम महाराष्ट्रात आदर्श आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी केले.

ठळक मुद्देविधायक दीपोत्सव सोहळा : गौरव मातृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम आदर्श- शिवाजीराव पंडित

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांचे कार्य हे महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचाराची परंपरा या कार्यक्रमातून पहायला मिळत आहे. गौरव मातृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम महाराष्ट्रात आदर्श आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी केले.श्रीगुरु बंकटस्वामी भक्त परिवाराच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्रकाश महाराज बोधले, महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, महंत महादेव महाराज चाकरवाडीकर, पंडित उद्धव बापू शिंदे, समाधान महाराज शर्मा, हरिदास भाऊ जोगदंड, आ.संगीता ठोंबरे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हर, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, माजी आ. पृथ्वीराज साठे, सभापती संतोष हांगे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, डॉ.अशोक थोरात, जि. प. सदस्य भारत काळे, सचिन कोठुळे, दादासाहेब मुंडे, नारायण शिंदे, समाजसेवक अनिरुद्ध गोरे, मोहन गुंड, अनिल जाधव, सरपंच दादाराव काळे आदी उपस्थित होते.सामाजिक क्षेत्रात, स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सामाजिक नवरत्नाचा गौरव सत्कार मान्यवर व संत महंतांच्या हस्ते करण्यात आला. यात आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे वैराग्यमुर्ती रामकृष्ण रंधवे बापू, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणारे सभापती राजसाहेब देशमुख, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सीताफळ सम्राट धैर्यशील सोळंके, महिला शेतकरी विद्या रुद्राक्ष, कारागृह पोलीस प्रशासनात सकारात्मक काम करणारे कारागृह अधीक्षक महादेव पवार, पाणी आणि माती क्षेत्रात काम करणारे जलमित्र संजय शिंदे, अनाथ मुलांच्या बाबतीत काम करणारे संतोष गर्जे, पत्रकारिता क्षेत्रांतील भागवत तावरे, क्रीडा क्षेत्रातील कुस्तीपटू राहुल आवारे यांचे वडील बाळू आवारे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, झाडे भेट व लागवडीचा संकल्प झाला.या सोहळ्यानंतर समाज प्रबोधनपर निवृती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन झाले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. नाना महाराज कदम आणि प्रा. सुरेश महाराज जाधव तसेच बंकटस्वामी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. प्रास्तविक सुरेश जाधव, सूत्रसंचालन ज्ञानदेव काशिद यांनी केले.

टॅग्स :BeedबीडDiwaliदिवाळीSocialसामाजिक