शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाचा कोप! शेतात काम करताना झाडावर पडली वीज; आडोशाला थांबलेल्या शेतकऱ्याचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:39 IST

कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने गावकरी सुन्न झाले आहेत.

परळी (जि. बीड): परळी तालुक्यातील सबदराबाद परिसरात सोमवारी रात्री निसर्गाने घातलेल्या घातामुळे एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या बालाजी बाबूराव चव्हाण (वय ३७) यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच अंत झाला. या घटनेसह तालुक्यातील दुसऱ्या एका घटनेत शेतकऱ्याचा बैलही दगावला असून, बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे.

या घटनेमुळे सबदराबाद आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

झाडाखालचा आसरा ठरला काळबालाजी चव्हाण हे सोमवारी रात्री आपल्या शेतात काम करत होते. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने, स्वतःचा बचाव करण्यासाठी ते जवळच असलेल्या एका झाडाखाली थांबले. मात्र, दुर्दैवाने त्याच झाडावर वीज कोसळली. या भीषण दुर्घटनेत बालाजी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले आणि एक भाऊ असा मोठा परिवार असून कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने गावकरी सुन्न झाले आहेत.

पशुधनालाही विजांचा फटकाविजांच्या कडकडाटाचा फटका केवळ मानवी जीवितालाच नाही, तर पशुधनालाही बसला आहे. तालुक्यातील कौडगाव हुडा येथील शेतकरी धनराज आश्रोबा फपाळ यांचा एक बैल वीज कोसळल्याने दगावला. शेतीचा मुख्य आधार असलेला बैल गेल्याने फपाळ कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाने त्यांनाही मदत देण्याची मागणी होत आहे.

प्रशासनाचे पंचनाम्याचे आदेशघटनेची माहिती मिळताच परळीचे प्रभारी तहसीलदार विनोद रणवारे यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला घटनास्थळी पाठवून पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. "बाधित कुटुंबांना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून तातडीने आर्थिक मदत मिळावी," अशी आर्त साद ग्रामस्थांनी प्रशासनाला घातली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lightning Strike Kills Farmer Seeking Shelter; Nature's Fury Unleashed

Web Summary : A farmer in Parli, Beed district, died after being struck by lightning while sheltering under a tree during a storm. The incident also resulted in the death of a farmer's bull. Authorities have ordered an assessment of the damages.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस