माझ्या घरासमोर मोदींना सभा घ्यावी लागते, यातच माझा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:10 AM2019-10-19T00:10:31+5:302019-10-19T00:10:59+5:30

२४ तास जनतेसाठी राबणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला संपवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला माझ्या घरासमोर सभा घ्यावी लागते. यातच माझा विजय असल्याचा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व परळी राकॉँचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

My victory in which Modi has to attend meetings in front of my house | माझ्या घरासमोर मोदींना सभा घ्यावी लागते, यातच माझा विजय

माझ्या घरासमोर मोदींना सभा घ्यावी लागते, यातच माझा विजय

Next
ठळक मुद्देधनंजय मुंडे : परळी येथील गणेशपारच्या सभेत प्रतिपादन

परळी : २४ तास जनतेसाठी राबणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला संपवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला माझ्या घरासमोर सभा घ्यावी लागते. यातच माझा विजय असल्याचा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व परळी राकॉँचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
गुरु वारी रात्री गणेशपार भागात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ज्या-ज्यावेळी गणेशपारच्या मंदिरात आशीर्वाद घेवून मी सभा घेतली, त्या-त्या वेळी गणरायाने मला कौल दिला आहे. योगायोगाने आज संकष्ट चतुर्थी आहे. हा एक शुभशकुन असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगून या गणेश मंदिराचा जीर्णोध्दार करण्याचे, शेजारच्या दुर्गोत्सव मंडळाला सभामंडप देण्याची शक्ती मला गणरायानेच दिली आहे. आज याच गणरायाचे आणि येथील जनतेचे आशीर्वाद मला मिळत असल्याने आपला विश्वास निश्चित असल्याचे ते म्हणाले.
माजी मंत्री पंडीतराव दौंड म्हणाले, ही निवडणूक आता धनंजयची राहिली नसून, जनतेची झाली आहे. माकपचे नेते कॉ. पी. एस. घाडगे म्हणाले, धनंजयचा विजय ही परळीची गरज आहे. तर धनंजय मुंडेंनी गणेशपार भागाला खुप काही दिले आता त्याची परतफेड करण्याची आमची वेळ असल्याचे काँग्रेसचे नेते डॉ.सुरेश चौधरी, किर्तीकुमार नरवणे, श्रीकांत मांडे, बाजीराव धर्माधिकारी, दिपक देशमुख, प्रा.डॉ.विनोद जगतकर, वैजनाथ सोळंके यांनी भाषणात सांगितले. या सभेला माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, डॉ.सुरेश चौधरी, किर्तीकुमार नरवणे, श्रीकांत मांडे, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, जाबेरखा पठाण, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, प्रा.डॉ.विनोद जगतकर, काँग्रेसचे बाबु नंबरदार, विश्वनाथ गायकवाड, वैजनाथ सोळंके, रघुनंदन खरात, मनसेचे सुमंत धस, श्रीकांत पाथरकर, दिलीप जोशी, गणपत कोरे, सोपानराव ताटे, भारत ताटे, मुन्ना बागवाले, संगिता तुपसागर, कमल निंबाळकर, के.डी.उपाडे, लालाखा पठाण सह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी केले.

Web Title: My victory in which Modi has to attend meetings in front of my house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.