माझ्या पतीला या कारणासाठी दुसरीकडे पाठवले, कराडचे नाव घेत महादेव गित्तेच्या पत्नीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 20:09 IST2025-04-07T20:08:34+5:302025-04-07T20:09:20+5:30

काही दिवसापूर्वी बीड येथील तुरुंगात वाल्मीक कराड आणि महादेव गित्ते या दोघांमध्ये वाद झाल्याचे समोर आले.

My husband was sent to another place for this reason, Mahadev Gitte's wife makes a serious allegation, taking Karad's name | माझ्या पतीला या कारणासाठी दुसरीकडे पाठवले, कराडचे नाव घेत महादेव गित्तेच्या पत्नीचा गंभीर आरोप

माझ्या पतीला या कारणासाठी दुसरीकडे पाठवले, कराडचे नाव घेत महादेव गित्तेच्या पत्नीचा गंभीर आरोप

बीडमधील तुरुंगात काही दिवसापूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोप वाल्मीक कराड आणि महादेव गित्ते या दोघांमध्ये मारहाण झाल्याचे समोर आले होते.  यानंतर महादेव गित्ते याची रवानगी दुसऱ्या कारागृहात केली आहे. दरम्यान, आता यावरुन महादेव गित्ते याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत.

"मला जेव्हा भिसेंच्या कुटुंबीयांचा फोन आला, तेव्हा..."; 'दीनानाथ'च्या डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितलं नेमकं काय बोलणं झालं

महादेव गित्ते याची पत्नी मीरा गित्ते यांनी मारहाण प्रकरणावरुन आरोप केले आहेत. "माझ्या पतीवर कारागृहात हल्ला करण्यात आला, त्या प्रकरणात मला गुन्हा दाखल करायचा होता, म्हणून मी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. मात्र कारागृह प्रशासन आमच्या आधीन नाही, त्यामुळे तुम्ही कारागृह प्रशासनाकडे तक्रार करा अशी माहिती मला यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिली. वाल्मीक कराडला आतमध्ये चांगली व्यवस्था मिळावी यासाठीच माझ्या पतीला कारागृहातून बाहेर काढले आहे, असा गंभीर आरोप मीरा गित्ते यांनी केला. 
 
सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाहीत

मीरा गित्ते म्हणाल्या, वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगने माझ्या पतीसह त्यांच्या मित्राला मारहाण केली आहे. उलट माझ्या पतीवरच मारहाण केल्याचा आरोप करत त्यांना बीड  कारागृहातून हर्सुल कारागृहात स्थलांतरित करण्यात आलं. आतमध्ये त्यादिवशी नेमकं काय घडलं याची माहिती समोर यावी म्हणून मी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे.  मात्र अर्ज करून देखील मला फुटेज मिळालेले नाहीत, असंही गित्ते म्हणाल्या. 

बीड कारागृहात नेमकं काय घडलं? धसांचा दावा काय?

आमदार सुरेश धस यांनी बीड कारागृहातील घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, "परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडने आम्हाला विनाकारण गुंतवून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांचा दावा आहे. याच रागातून महादेव गित्ते याने आता तुरुंगात वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं मला कळालं," असं धस यांनी सांगितलं होतं.

Web Title: My husband was sent to another place for this reason, Mahadev Gitte's wife makes a serious allegation, taking Karad's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.