चांदापूरच्या शाळकरी मुलाचा खूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:54 IST2018-12-24T00:53:58+5:302018-12-24T00:54:11+5:30
चांदापूर येथील नऊ वर्षीय अनिकेत गित्ते याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने परळी ग्रामीण पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी २० रोजी गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा दाखल केला

चांदापूरच्या शाळकरी मुलाचा खूनच
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : तालुक्यातील चांदापूर येथील नऊ वर्षीय अनिकेत गित्ते याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने परळी ग्रामीण पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी २० रोजी गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा दाखल केला. खुनाचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.
शहरापासून जवळच असलेल्या चांदापूर येथे १५ डिसेंबर रोजी अनिकेत जगन्नाथ गित्ते याचा घराजवळ असलेल्या पाण्याच्या छोट्या हौदात मृतदेह आढळून आला. रात्री परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली होती. १६ डिसेंबर रोजी अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड व परळी ग्रामीणचे सुरेश चाटे यांनी चांदापुरात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या अनिकेतचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेणे सुरु केले होते. घटना घडल्यापासूनच हा खुनाचा प्रकार असल्याची चर्चा होती.