हत्या की आत्महत्या; शेतकरी पती-पत्नीचा घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
By सोमनाथ खताळ | Updated: May 4, 2023 14:30 IST2023-05-04T14:29:24+5:302023-05-04T14:30:37+5:30
मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

हत्या की आत्महत्या; शेतकरी पती-पत्नीचा घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
बीड : तालुक्यातील नाळवंडी गावातील शेतकरी पती-पत्नीचा एकाचवेळी मृत्यू झाला आहे. एका खोलीत पत्नीचा मृतदेह आढळला असून दुसऱ्या खोलीत पतीचा लटकलेला मृतदेह आढळला. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली आहे. हत्या की आत्महत्या? याचा तपास पिंपळनेर पोलिस करत आहेत.
बाबासाहेब रावसाहेब म्हेत्रे व कुषीवर्ता बाबासाहेब म्हेत्रे अशी मयतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. अद्यापर्यंत याची पोलिस ठाण्यात नाेंद नव्हती. मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.