खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:31 IST2018-06-21T00:31:39+5:302018-06-21T00:31:39+5:30

 The murder accused in the murder case arrested | खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

परळी : शहरातील सिद्धार्थनगरातील श्याम मुंडे यांच्या १६ मे रोजी झालेल्या खून प्रकरणातील फरार एका आरोपीस येथे बुधवारी रात्री परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पकडले असून त्यास अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी दिली. अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या पाच झाली आहे. आणखी काही आरोपी फरार आहेत.

परळीच्या सिध्दार्थनगरात १६ मे रोजी झालेल्या तलवारीच्या हल्ल्यात जखमी होऊन श्याम मुंडे (रा. सिद्धार्थनगर) यांचा लातूरच्या दवाखान्यात उपचार चालू असताना मृत्यू झाला होता. अनिल कांबळे यांनी फिर्याद दाखल केल्यावरून सुदीप सोनवणे (रा. सिद्धार्थनगर, परळी) सह इतर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील चार आरोपी यापूर्वी अटक केलेले आहेत.

बुधवारी रात्री एकास अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, जमादार रमेश सिरसाट, दत्ता गित्ते, घोळवे, सानप, मस्के यांनी केली.

Web Title:  The murder accused in the murder case arrested