मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या बीडच्या कैकाडी मिक्स गँगवर ‘मोक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:56 IST2019-02-08T17:55:48+5:302019-02-08T17:56:54+5:30
बीडसह मराठवाड्यात चोरी, दरोडे, घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या कैकाडी मिक्स गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या बीडच्या कैकाडी मिक्स गँगवर ‘मोक्का’
बीड : बीडसह मराठवाड्यात चोरी, दरोडे, घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या कैकाडी मिक्स गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
संतोष ओंकार गायकवाड (२३ रा.रामनगर ता.गेवराई), अक्षय भानुदास जाधव (२४ सावरखेडा ता.गंगापूर जि.औरंगाबाद), दीपक बबन गायकवाड (२८ रा.लवूळ ता.माजलगाव), बबन मोतीराम गायकवाड (५६ रा.लवूळ ता.माजलगाव) यांच्यासह अन्य एकाचा टोळीत समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, पोनि भाऊसाहेब गोंदकर, पोउपनि औटे, मजहर, आधटराव, अभिमन्यू औताडे आदींनी केली.